Wardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: वर्धेत भाजपची हॅट्रिक लागणार की पवारांची तुतारी वाजणार?

Wardha Lok Sabha Election 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजेच वर्धा जिल्हा सेवाग्राम आणि पावणारा आश्रमाची ख्याती जगात आधीच पसरून आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याचा धामणगाव रेल्वे आणि मोर्शी चा समावेश होतो. वर्धा लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस सुद्धा यावेळी उभा आहे.

वर्धा विधानसभेचा विचार केला तर धामणगाव रेल्वे, आर्वी, हिंगणघाट तर अमरावतीतील मोर्शी, देऊळी आणि वर्धा असे एकूण सहा मतदार संघ आहेत. धामणगाव रेल्वे, आर्वी, हिंगणघाट येथे भाजपचे आमदार आहे तर अमरावतीतील मोर्शी येथे स्वाभिमान पक्षाचे देवेंद्र भुयार आमदार आहेत तर देवळी मध्ये काँग्रेसचे रणजीत कांबळे आमदार आहेत. आणि वर्धा लोकसभेत लागोपाठ तीन वेळा भाजपचा कमळ फुलवणारे रामदास तडस हे आमदार आहे. आणि यावर्षी सुद्धा तिसऱ्यांदा भाजपकडून रामदास तडस यांना लोकसभेकरिता संधी मिळाली आहे.

वर्धा लोकसभा निवडणूक निकाल 2009:

काँग्रेस चे दत्ता मेघे 2009 मध्ये 3,52,853 मतांनी खासदार म्हणून निवडून आले होते, तर त्यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांचा 95000 मतांनी पराभव केला होता.

वर्धा लोकसभा निवडणूक 2014:

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते सागर मेघे यांचा पराभव करून जागा जिंकली होती. तडस यांना 5,37,518 मते मिळाली तर सागर मेघे यांना 3,21,735 मते मिळाली होती. एकूण 2,15,783 मतांच्या फरकाने कमळाने बाजी मारली होती. पुरुष मतदार संख्या 817514 तर महिला मतदार संख्या 747024 एवढी होती. त्यावेळी 65% मतदान झाले होते.

वर्धा लोकसभा निवडणूक 2019:

भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधित्व करणारे रामदास तडस यांनी पुन्हा एकदा मते मिळवत 5,78,364 मतांची आघाडी घेत काँग्रेस पक्षाच्या चारूलता टोकास (3,91,173) यांना 1,87,191 मतांच्या फरकाने पराभूत केले. त्यावेळी पुरुष मतदार संख्या 8,17,514 तर महिला मतदार संख्या 7,47,024 इतकी होती.

वर्धा लोकसभा निवडणूक 2024: महत्त्वाच्या तारखा

– अधिसूचना जारी करणे: 28 मार्च 2024

– नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2024

– नामांकनांची छाननी: 05 एप्रिल 2024

– उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख: 08 एप्रिल 2024

– मतदानाची तारीख: 26 एप्रिल 2024

– मतमोजणी: 04 जून 2024

– निवडणूक पूर्ण होण्याची तारीख: 06 जून 2024

भाजप विरुद्ध तुतारी वाजणार का?

राष्ट्रवादी गटाकडून रंगत चाललेल्या उमेदवारीवर आता अंकुश लागला आहे आणि अमर काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेल्या अमर काळे हे आज 2 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितित अर्ज दाखल करणार आहे. ‘ तुतारी ‘ या चिन्हावर अर्ज टाकणार आहेत. अमर काळे हे या आधी पंजा चिन्हावर लढलेले आहेत. आता तुतारीचा वापर करून भाजपची वाजवणार का? असे आव्हानात्मक काम काळे यांच्यावर आहे.

कराळे मास्तर आणि शरद पवार गट.
फिनिक्स अकॅडमी चे संस्थापक नितेश कराळे मास्तर यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश काही दिवसाआधीच झाला होता. वर्धातून कराळे लोकसभेसाठी इच्छुक होते आणि त्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट ही घेतली होती, मात्र अमर काळेंना तिकीट निश्चित झालेलं आहे, तर शरद पवार गटाचे प्रचारक म्हणून आता कराळे मास्तर काम करणार आहेत.

अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगलेली आहे. शरद पवार गटाचे विदर्भातील एकमेव उमेदवार अमर काळे आहेत. त्यांच्या नामांकन अर्जासाठी शरद पवार यांची उपस्थीती लागणार आहे. याचा फायदा नक्कीच शरद पवार गटाला होणार का? की भाजपच्या रामदास तडस यांची हॅट्रिक लागणार हे पाहणे नक्कीच आवश्यक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 7 =