Wani Truck Accident: लालगुडा चौपाटी जवळ भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*

Wani Truck Accident – एका भरधाव ट्रकने तरुणास चिरडले. या भीषण अपघातात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.शनिवारी संध्याकाळी ८.०० चा सुमारास हा अपघात घडला. मंगेश ऋषिकेश बोरीकर (वय ३७ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की मृदेहाचा पार चेंदामेंदा झाला. मंगेश हा नवीन लालगुडा वणी येथील रहिवासी होता. शनिवारी दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी एम आय डी सी परिसरात काही कामानिमत्त तो गेला होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

संध्याकाळी पायदळी परत येताना लाळगुडा चौपाटी जवळ एका ट्रकने मंगेशला उडविले. या घटनेमध्ये ट्रॅकच्या चाकाखाली आल्याने त्याच्या कमरेखालील भागाचा पार चेंदामेंदा झाला. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेवून पसार झाला. घटनेची तत्काळ माहिती वणी पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णलयामध्ये पाठविला. पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. मंगेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen − four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.