Walmik Karad Arrested : अखेर वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात ? CID पथकाने केली कारवाई

Walmik Karad Arrested : परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.यानंतर त्याला पोलीस तपास पथकाला सुपूर्द करण्यात येणार आहे.परळी पोलिसांनी वाल्मीक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे.

मात्र मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर या संपूर्ण प्रकरणात वाल्मीक कराड मास्टर माईंड असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे तो या भागातून फरार झाला होता.आता वाल्मिक कराड याला तपास पथकाने सोमवारी पुणे मधून ताब्यात घेतले आहे

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

.या संदर्भात सोमवारी काही वृत्त माध्यम आणि हॅलो कोल्हापूर या वेबपोर्टलनेसुद्धा पुणे मधून कराडला ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रकाशित केलेले आहे.या दरम्यान त्याला ताब्यात घेणाऱ्या पथकातील CID च्या अधिकारीनेही या वृत्तास दुजोरा दिला असल्याचे म्हटले जात आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणातील मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराड हा या घटनेनंतर फरार झाला होता. विरोधकांनी कराड हा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता या प्रकरणात सामील असल्याचे आरोप तरी त्याला तात्काळ अटक करून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला आहे.

दुसरीकडे पोलिसांनी वाल्मीक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्याला ताब्यात घेण्याचे दावे होत असतानाच, यापूर्वी पोलिसांनी वाल्मिक कराड आणि सरपंच देशमुख खून प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे मास्टरमाइंड समजला जाणारा आरोपी वाल्मिक करोड याचे आणि त्याच्या काही नातेवाईकांची सुद्धा बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हे आरोपी आहेत फरार.

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर पोलिसांनी ज्यांच्या कुणाचे गुन्हे दाखल केली आहे त्यातील आरोपी यापैकी आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आरोपी सुदर्शन घुले,कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे फरार आहेत तर पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वीप्रतीक घुले, विष्णू चाटे जयराम चाटे, महेश केदार, या चौघांना आधीच अटक केलेली आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणात आरोप झाल्यानंतर वाल्मीक कराड हे फरार झाले होते. ते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीसुद्धा वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केले आहे.तर दुसरीकडे या खून प्रकरणात तेच मास्टर माइंड असल्याचे बोलले जात आहे.

मात्र या संदर्भात पोलिसांकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.मात्र या दरम्यानच पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणीच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सोमवारी वाल्मिक कराडला याला पुणे येथून अटक करण्यात आली,मात्र त्यांना पोलिसांनी कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली,हे पोलिसांकडून स्पष्ट होणार आहे.त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात हा मुद्दा महत्वाचे ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.