Unseasonal Rain: महागाव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर.

Unseasonal Rain: महागाव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर.

Unseasonal Rain: कापुस, तुर, हरबरा, गहु, ऊस पिकासंह फळबागांचे नुकसान.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

महागाव: अवकाळी झालेल्या मुसळधार पावसाने कापुस, तूर,हरबरा, गहु,भाजीपाला,फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. महागाव तालुक्यात सोमवार दि.२७नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या शेतात वेचणी अभावी उभा असलेला कापुस भिजला आहे तर तुरीला ऐन शेंगा धरण्याच्या काळात पावसाने झोडपुन काढल्याने सर्व पिकाचे नुकसान होवुन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

रब्बी हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असुन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरबरा,गहु पिकांची लागवड करून पिकांनी जमिनीतुन आपले डोके वर डोकावले असतांनाच रात्रीच्यावेळी झालेल्या अवकाळी पावसाने घाला घातला त्यात सर्व पिके जळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.तर वादळी अवकाळी पावसाने भाजीपाला पिके, केळी,पपई,संत्रा,मोसंबी, चिकु फळबागांचे सुद्धा प्रचंड नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कागदी घोडे न नाचवता तत्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

चौकट

अगोदरची नुकसान भरपाई मिळणार कधी.

मागील वर्षीच्या रब्बी हंगामात हरबरा,गहु पिक काढणी साठी आले असतांनाच तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याच प्रमाणे चालु वर्षीच्या खरीप हंगामात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून शेतातील पिके अक्षरशः खरडून गेली तेव्हा सुद्धा शासनाने पंचनामे करून कागदी घोडे नाचविण्याचेच काम करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला दोन्ही हंगामाची नुकसान भरपाई आज न उद्या मिळेल या आशेवर जगत पुन्हा कर्ज उधारी उसनवारी करून नव्या जोमाने शेतात बियाण्याची लागवड केली परंतु काल झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा घात केला आहे. शेतकऱ्यांवर वारंवार अस्मानी संकटाचा मारा होत असताना त्यातुन सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × one =