शेगाव खोडके ते रिसोड रस्त्याची बिकट अवस्था.

शेगाव खोडके ते रिसोड रस्त्याची बिकट अवस्था.

प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते

Risod ते Shegaon Khodke ह्या रस्त्याची जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून अतिशय दैनंदिन अवस्था झाली आहे हे गाव विदर्भ मराठवाडा सरहद अवघ्या पाच ते सात किलो मीटर अंतरावर आहे रिसोड हे मोठे बाजारपेठ असल्याकारणाने जवळपास आठ ते दहा गाव या रस्त्यावरून येणे जाणे सुरू आहे ह्या रस्त्यावरून माळशी, वाघजाळी, आजेगाव, ताकतोडा ,वरखेडा, कहाकर आदी.

गावांचे सर्व व्यवहार हे रिसोड बाजारपेठ मध्ये आहेत तसेच या गावांना दवाखान्यामध्ये येण्यासाठी सुद्धा याच रस्त्याचा वापर करावा लागतो गेल्या वर्षी थातूर मातुर काम करण्यात आले होते विदर्भ सरहद पर्यंत चार ते पाच किलोमीटर हा रस्ता करण्यात यावा अशी मागणी या गावातील जनतेतून होत आहे तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम स्थानिक आमदार ,खासदार, यांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 8 =