Suicide Case: विरखेड येथील घटना!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Suicide Case: शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या!

सतत च्या नापीकीला कंटाळून एका तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना वीरखेड येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली,
रितेश राजेंद्र परडखे वय 24 रा. विरखेड असे मृतकाचे नाव आहे. रितेशच्या वडीलाकडे विरखेड शिवारात सर्व नंबर 41 मध्ये 3 एकर शेती आहे,सदर शेती मृतक रितेश पाहत होता, दरवर्षी नापीकी व शेतीत न होणारे उत्पन्न त्यातच वडीलांनी खाजगी कर्ज घेतले होते.

ते कसे फेडायचे या विवेंचनात असतांना दिनांक 20 ला पहाटे 6 वाजता दरम्यान भानुदास परडखे यांचे विरखेड शेतात लिंबाच्या झाडांला नायलॉनचा दोर बांधून आत्महत्या केल्याचे उघडीस आली. घटनेची माहिती मिळताच वडील व गावातील नागरीकांनी घटणास्थळी धाव घेतली सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन केले, घटनेची फिर्याद वडील राजेंद्र माधव परडखे 60 वर्ष यांनी दिली, असून अधिक तपास बाभूळगाव पोलीस करीत आहे.रितेशच्या मागे आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे,

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

5 × four =