Sports Competition: विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या १५ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड !
विविध खेळात मिळवले यश, सर्वाधिक ३३ विद्यार्थी विभाग स्तरावर !
Sports Competition: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, येथे संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवीत विजयी झाले.
त्यामध्ये कुबेर पडगिलवार बुद्धिबळ, अक्षरा ठाकरे ४०० मीटर हर्डल्स, श्रावणी डिके ज्युडो, समृद्धी कपिले ज्युडो, संस्कार मोहिते आर्चरी, व्यंकटेश हेडा बांबुउडी, पार्थ नगरभाडीया जुडो, आर्या राठोड बांबू उडी, गार्गी थोरवे ज्युडो,ओंकार मोहिते आर्चरी, अवनी हरसुलकर जुडो ,आसावरी भलगे बांबू उडी, अनुश्री कायंदे ज्युडो, गीतम नांढा ज्युडो, पार्थ राठोड रग्बी, हे खेळाडू विद्यार्थी सांगली सिंधुदुर्ग चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.
त्याबरोबरच विभाग स्तरीय रब्बी स्पर्धेत मुलांच्या १७ वर्षे वयोगटात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. व विभागवार तिसरा क्रमांक पटकावला. त्यामध्ये पार्थ राठोड, पृथ्वी नेमाडे, मंदार भुजाडे, चैतन्य राठोड, हिमांशू पवार , हर्शांक राऊत , ओम खंडेलवाल ,कुबेर पडगिलवार ,वेदांत शर्मा , उत्कर्ष राठोड या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभागातून तिसरा क्रमांक मिळवला.
प्राविण्य प्राप्त खेळाडू सिंधुदुर्ग ,सांगली ,चंद्रपूर येथे २९ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे .त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे संस्थेचे संस्थापक डॉक्टर संजय बंग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या याशाचे श्रेय क्रीडा प्रशिक्षक उमेश भटकर , प्रतीक्षा उईके मुख्याध्यापक नितीन राऊत सर मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे सर, मुख्याध्यापक विलास राऊत सर यांना दिले.