स्वाती कंपनीला अभय देणाऱ्या मनपा उपायुक्ताच्या कक्षात Shivsena Uddhav Balasaheb Thackerayचे ठिय्या आंदोलन.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन*

जल प्रदाय विभागाचे अधिकाऱ्याची कक्षबाहेर तोडली खुर्ची.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

अकोला मनपा क्षेत्रातील नागरिकांकडून कर वसुलीचा ठेका गैर पद्धतीने स्वाती कंपनीला दिला. ही कंपनी शहरातील रहिवाशी नागरिकांना घर जप्तीची धमकी देत आहेत.आणि त्यांना मनपा कडून अभय मिळत आहे. त्यांची ही दादागिरी Shivsena Uddhav Balasaheb Thackeray पक्ष खपवून घेणार नाही हे सांगण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांकडून कर वसुली करायची असेल तर स्वाती कंपनीला दिले जाणारे कमिशन नागरिकांना शास्ती माफ करून मनपा ने स्वतः कर वसुली करावी.

या मागणी साठी आज मनपा उपयुक्त यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या सोबतच जल प्रदाय आणि कर विभागाचे कार्यालयाला टाळा ठोकून विभागाचे अधिकारी केवळ खुर्च्या झीजवत आहेत त्याचा निषेध म्हणून त्या कक्षतून खुर्ची बाहेर आणून तोडण्यात आली. मनपा ने प्रशासकपदाचे अधिकाराचा गैर फायदा घेत कर वसुलीचा ठेका स्वाती कंपनीला दिला आणि मनमानी पद्धतीने कमिशन दिले.

हे अकोला महानगर पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना कामच उरले नाही अश्याही स्थितीत स्वाती कंपनी मनपा कर्मचाऱ्यांचा वापर करून कर वसुलीसाठी नागरिकांना धमक्या देत आहेत. अश्या धमक्या देणाऱ्या स्वाती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनपा कडून अभय मिळत आहे. त्यामुळे त्या कंपनीला अभय देणाऱ्या मनपा उपायुक्त यांच्या कक्षात शिवसेनाउद्धावं बाळासाहेब ठाकरेपक्षाचे महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांचे नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

याच वेळी जल प्रदाय विभागाचे अधिकारी नागरिकांच्या सेवेकडे दुर्लक्ष करतात म्हणून त्यांची खुर्चीही तोडण्यात आली व कर विभागाचे कार्यालयालाही टाळा ठोकला.यावेळी राजेश मिश्रा गजानन बोराले तरुण वगैरे अनिल परचुरे सुरेंद्र विसपुते पिंटू बोंडे अंकुश शिंत्रे सतीश नागदिवे राजेश इंगळे देवा गावंडे अविनाश मोरे बाळू ढोले पंकज बाजोळ रोशन राज आकाश राऊत योगेश गवळी चेतन मारवाल श्याम रेडे बंडू सवयी अमित भिरड राजेश कानापुरे अभिषेक मिश्रा सुनील दुर्गिया रामेश्वर पडुलकर संजय पिल्लू आदींची उपस्थिती होती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − 13 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.