Shakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.

Shakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.

Shakuntala Railway विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ: ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्ग ‘यवतमाळ-मुर्तिजापूर’ रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी ५० टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.  वर्षभरापासून रेल्वेमार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता. राज्याच्या गृह (परिवहन) विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी २०१७ पासून मध्य रेल्वेकडे पत्र व्यवहार सुरू होता.

परंतु, राज्य शासनाचा ५० टक्के निधीचा हिरवा कंदील बाकी होता. राज्य शासनाने ५० टक्के निधीची घोषणा केल्यामुळे आता मध्य रेल्वेद्वारे विस्तृत प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल. प्रकल्प खर्च अंदाज मध्य रेल्वेद्वारे राज्य शासनाला पाठवण्यात आल्यानंतरच ५० टक्के निधीच्या मंत्रिमंडळ मान्यतेसाठी हा प्रकल्प राज्य मंत्रीमंडळासमोर ठेवल्या जाईल.

राज्य शासनाचे यवतमाळकरांच्या वतीने आभार.

पश्चिम विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला शकुंतला रेल्वेमार्ग गेज परिवर्तन प्रकल्प यवतमाळकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ  आर्थिक राजधानी मुंबईशी जोडल्या जाणार आहे. परिणामी, यवतमाळ जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. यवतमाळ – मुंबई आणि यवतमाळ – पुणे अशी रेल्वे भविष्यात या रेल्वेमार्गावरून सुरू होणार आहे. त्यामुळे यवतमाळकर जनता राज्य शासनाचे आभार मानत आहे.

आदीलाबाद – माहूर – वाशिम रेल्वेप्रकल्पलासुद्धा ५० टक्के निधीची तरतूद

वर्धा – पुसद -नांदेड रेल्वेमार्ग प्रगतीपथावर आहे. आदीलाबाद – माहूर – पुसद – वाशिम रेल्वेमार्गामुळे
पश्चिम विदर्भातील रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

स्पेशल रेल्वे प्रोजेक्टचा दर्जा देऊन लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावा. ब्रिटिश कंपनीकडे असलेल्या मालकीहक्काशी संबंधित तांत्रिक अडचण सोडवण्यात अनेक वर्षे वाया गेल्यामुळे  प्राथमिकता देणे आवश्यक आहे.

– अक्षय पांडे (समन्वयक, शकुंतला रेल्वे विकास समिती, यवतमाळ)

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × two =