Sambhajinagar Crime : शहरातील बाफना ज्वेलर्स मध्ये आश्चर्यचकित आणि विश्वासावर घाला घालणारी बातमी समोर आली आहे.बाफना ज्वेलर्समधून दोन,तीन ग्रॅम नव्हे चक्क साढे 3 किलो सोने अचानक गहाळ झाल्याने व्यवस्थापनात खळबळ माजली होती.नंतर बाफना ज्वेलर्स मधून इतक्या मोठया प्रमाणात सोने चोरी कुणी केले,याची चौकशी झाली अन् ऑनलाईन जुगाराचा सवय असलेल्या व्यक्तीनेच काम करताना हा सोना चोरी केल्याची बाब समोर आली.पाहू या ही घटना नेमकी कशी झाली आणि या सोने चोरी मागे कोण होते….
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रसिद्ध असलेल्या बाफना ज्वेलर्स मधून हळूहळू सोने चोरीला जात होते. या ठिकाणी अनेक लोक काम करत असताना बाफना ज्वेलर्समध्ये या प्रसिद्ध प्रतिष्ठानात मॅनेजर पदावर काम करीत असलेल्या व्यक्तीला ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय होती.
यात तो मोठ्या प्रमाणात पैसे हरला होता. उधारीचे पैसे फेडण्यासाठी मग त्याने शक्कल लढविली आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रतिष्ठानमधून तब्बल 1 कोटी 92 लाख रुपयांचे सोने त्याने हळूहळू चोरले.मात्र काही दिवसातच दुकान संचालकांना संशय आल्याने या मॅनेजरच्या कृत्याचा भंडाफोड झाला अन् हा मॅनेजर पकडला गेला.
छत्रपती संभाजीनगर येथील बाफना ज्वेलर्स मध्ये आधी कारागीर म्हणून कामाला असलेल्या संदीप प्रकाश कुलथे असे या सोनं चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.संदीप कुलथे हा तेथे नंतर असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून तीन महिन्यांपासून काम करीत होता.पण तो काम करीत असताना गेल्या काही दिवसांपासून त्याचे कामकाज आणि व्यवहाराबद्दल व्यवस्थापनाला संशय आला होता.त्यामुळे तेथील सोने चांदी स्टॉकची माहिती घेतली असता त्यात मोठा अपहार झाल्याचे दिसून आले.
ऑनलाईन आणि ताश जुगारात झाला कर्जबाजारी.
बाफना मध्ये काम करीत असलेल्या संदीप कुलथे याला ऑनलाईन जुगार आणि पत्त्यांचा जुगार खेळण्याची सवय होती.गेल्या गणेश उत्सवाच्या काळात तो नेहमी ताशपत्ते खेळायचा. यात तो खूप पैसेही हरला होता. आणि त्याच्यावर उधारी झाली होती.
त्याच्यावर कर्ज झाले होते.याव्यतिरिक्तही त्याने आपल्या नातेवाइकांकडूनदेखील उधारापोटी मोठी कर्जाची रक्कम घेतली होती. विशेष म्हणजे दीड वर्षापूर्वी संदीप याने याच सवयीमुळे आपला वडगाव कोल्हाटी येथील स्वतःचा घर 30 लाख रुपयांत विकून ती सर्व रक्कम त्याने जुगारात उडवून टाकल्याचे सांगितले जाते.
संदीप कुलथे याला वयाच्या 16 व्या वर्षापासूनच जुगार खेळण्याची सवय असल्याची माहिती समोर आली आहे.जुगारात पैसे हरत गेल्याने त्याने बाफना ज्वेलर्स मध्ये सोने चोरी कृत्याला अंजाम दिल्याने आता तो जेल मध्ये गेला आहे.संदीप खूप कर्जबाजारी झाल्याने यानंतर त्याने काम करत असताना हळूहळू बाफना ज्वेलर्समधून सोने चोरी करणे सुरू केले.यात त्याने तब्बल पाऊणे 3 किलो सोना किंमत 1 कोटी 92 लाख रुपयांच्या सोने चोरले.
तेथे काम करत असताना संदीप हळूहळू सोने चोरी करीत होता,पण त्याच्या कामावर संशय आल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर आता संभाजीनगर येथील जीन्सी पोलीस ठाणे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.
हातचलाखी करून चोरले पावणेतीन किलो सोने.
संदीप कुलथे हा या सोन्याच्या दुकानात काम करताना दुकानात आलेल्या सोने दागिन्यांच्या मोडीच्या व्यवहारात, वजनात हातचलाखी करत होता.मोड मधील सोने तो अलगद बाजूला काढून ठेवत होता.हा प्रकार सुरू केल्यानंतर त्याने फक्त 2 महिन्यातच एकूण 87 दागिने चोरले होते.24 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर दरम्यान बाफना ज्वेलर्स मधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याने सोने चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
या दरम्यान त्याने तेथील सुवर्णपेढीतून ही सोने गहाळ केले होते. या चोरीत संदीपने एकूण 22 आणि 24 कॅरेटच्या सोन्याची चेन, ब्रासलेट, कडे आणि इतर सोन्याचे वस्तू मिळून सुमारे 1 कोटी 92 लाख 90 हजार 290 रुपयांचा सोन चोरल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.