Samadhi Andolan: शहरातील शासकीय कार्यालय परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी आरटीआय कार्यकर्ता दादाजी पोटे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली. लोटांगण आंदोलन केले. मात्र, कोणत्याही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गुरूवारी त्यांनी तहसील कार्यालयासमोर पाच फूट खड्डा खोदून समाधी आंदोलन केले. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले.
येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, न्यायालय, एसडीओ कार्यालय, एसडीपीओ कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम विभागासारख्या कार्यालयांच्या परिसरातील रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यासाठी दादाजी पोटे यांनी कंबर
कसली. काही दिवसांपूर्वी लोटांगण आंदोलन केले. मात्र, रस्ता बनविण्यात आला नाही.
त्यामुळे त्यांनी समाधी आंदोलन केले. दरम्यान, रस्ता दुरुस्ती कायद्यांतर्गत कारवाई केल्यास किंवा आंदोलनाला परवानगी न दिल्यास तहसीलसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.