Road Accident: धामणगाव रोडवरील दीप बार समोरील घटना.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

भरधाव रेतीट्रकची दुचाकीला धडक 3 गंभीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Road Accident: बाभुळगाव बस स्थानक नजीक धामणगाव रोडवरील दीप बार जवळील पेट्रोल पंपाच्या समोर धामणगाव कडून येणाऱ्या भरधाव  वेगाने अवैध रेती भरून येत असलेल्या ट्रकने दुचाकीला मागुन धडक दिल्याने  ॲक्टिवा दुचाकीवरील ३ जन फेकल्याने गंभीर जखमी होऊन  रेतीचा ट्रक उलटल्याची  घटना दिनांक 27डिसेंबर रोजी सांयकाळी ६.४५ वाजतादरम्यान  घडली. यात गंभीर जखमी झालेल्या मध्ये दुचाकी  स्वार विकास चंद्रशेखर अलोणे.

पत्नी स्वाती विकास अलोणे,४० व मुलगा सोहन विकास अलोणे 12वर्ष यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना यवतमाळ शासकिय रुग्णालयात भरती करण्यात आले. विकास आलोने  व त्यांची पत्नी व मुलगा आपल्या ॲक्टिव्हा क्रमांक MH 29AF 1817 या दुचाकीने तालुक्यातील हदगाव यात्रेवरुण यवतमाळ येथे जात होते. दरम्यान बेंबळा नदीवरून रेतीची अवैध वाहतूक करणार ट्रक  क्रमांक MH 40 3139 यवतमाळकडे जात होता.

त्या दरम्यान दीप बार जवळ ट्रकने दुचाकीला मागेहून धडक देऊन उलटला. ट्रकला जेसीबीच्या साहाय्याने बाजार समितीच्या आवारात लावण्यात आला. जखमींना बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना यवतमाळ येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले होते. पोलीस सूत्राच्या माहिती नुसार विकास अलोणे यांचा हात कटल्याने त्याला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.