Ramtek Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून काँग्रेसने बळकावली जागा.

Ramtek Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून काँग्रेसने बळकावली जागा.

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही एस सी (SC ) प्रवर्गाची संसदीय जागा आहे. त्यात नागपूर जिल्ह्याचा काही भाग आहेत लोकसभा मतदारसंघ साक्षरता दर 78.95% आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभेचे सहा विधानसभा क्षेत्र आहेत: काटोल, सावणेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक.

रामटेक मतदारसंघात 9.96 लाख पुरुष आणि 9.24 लाख महिला असे एकूण 19.21 लाख मतदारांसाठी 2,364 मतदान केंद्रे आहेत. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला रामटेक लोकसभा गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये एकीकृत शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे हे मोठ्या फरकाने येथून निवडून आले होते. मात्र आता राजकीय समीकरण बदललेली असताना रामटेक मध्ये काय होणार याचा काही नेम नाही.

रामटेक ची भौगोलिक पार्श्वभूमी.

प्रभू श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेले रामटेक वनवासीच्या काळात प्रभूराम, सीता आणि लक्ष्मण या ठिकाणी आल्याचं पुराणात सांगितलं गेलंय. याच नावाने नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रामटेक लोकसभा मतदरसंघ म्हणून ओळख आहे. या मतदार संघात बुद्धिस्ट 14.37% लोकसंख्या आहे. जैन 0.53, ख्रिश्चन 0.74%, मुस्लिम 5.1%, SC 17.5%, ST 11% आणि सिख 0.44% लोकसंख्या आहे.

रामटेक साठी इच्छुक उमेदवारी कोणाची?

नागपूर शहराच्या चारही बाजून वेढा घातलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत. या लोकसभा निवडणुकीत तुमाने यांच्यासह इतरही इच्छुक उमेदवारांची चर्चा मतदारसंघामध्ये रंगली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांची उमेदवारी भक्कम मानली जातीय. त्यांना हॅट्रिक ची संधी मिळणार का? हा प्रश्न आहे. 2019 साली पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यावेळी सुद्धा इच्छुक आहेत.

उत्तम कापसे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असून त्यांचही नाव इच्छुकांच्या यादीत आहे. विधान परिषद सदस्य आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गजभिए सुद्धा स्पर्धेत आहेत. युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत तर भाजपा तर्फे माजी जिल्ह्याध्यक्ष अरविंद गजभिये यांच नाव तर काँग्रेस पक्षाच्या रश्मी बर्वे या देखील रणांगणात उतरल्या आहेत.

रामटेक जिल्ह्याचा राजकीय इतिहास.

– 2009 च्या निवडणुकीत विजयी झालेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक हे रामटेक या राखीव मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते.
– 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या कृपाल बालाजी तुमाने यांनी मुकुल वासनिक यांचा 1,75,791 च्या फरकाने पराभव केला होता.
– कृपाल बालाजी तुमाने यांना 5,19,892 मते मिळाली, त्यांचे प्रतिस्पर्धी मुकुल वासनिक यांना 3,44,101 मते मिळाली होती.
– 2019 मध्ये कृपाल बालाजी तुमाने शिवसेना यांनी 5,97,126 मते मिळवून विजय मिळवला तर काँग्रेसचे किशोर गजभिये यांना 4,70,343 मते मिळाली होती. 1,26,783 मतांच्या फरकांनी ते पराभूत झाले होते.

रामटेक मधून रश्मी बर्वे यांना मिळाली तिकीट.

काँग्रेस आणि शिवसेना यांच्या शर्यतीत काँग्रेस ने जागा बळकावली असून रश्मी बर्वे यांना तिकीट मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी रश्मी बर्वे यांच्या जातप्रमाणपत्र प्रकरणी अडथळे होते. मात्र उच्च न्यायालयाने बर्वे यांना दिलासा दिल्याने त्यांचा रामटेकमधून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी अखेर रश्मी बर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

महाविकास आघाडीमध्ये रामटेकच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढीत ही जागा काँग्रेसला आपल्या कडे आणण्यात काँग्रेसला यश आले आहे. त्यामुळे आता काँग्रेस आता रामटेक मध्ये झेंडा फडकवणार का? याची उत्सुकता लागली आहे.

कोण आहेत रश्मी बर्वे?

जिल्हा परिषद अध्यक्षपदावर रुजू होताच रश्मी बर्वे या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. 2012 मध्येही त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्या होत्या. पारशिवनी तालुक्यातील टेकाडी जिल्हा परिषदेच्या सदस्य असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. रश्मी बर्वे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत जिल्ह्याच्या नागरिकांसाठी चांगले कार्य केले आहे.

उमेदवारी न मिळाल्याने किशोर गजभिये नाराज?

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली असली तरी, काँग्रेस नेते किशोर गजभिये देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहे. काँग्रेस कडून तिकीट न मिळाल्याने गजभिये यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र वरून त्यांच्या फॉर्म कॅन्सल होण्याची शक्यता दर्शविली आहे. काँग्रेस कडून दोन उमेदवार उभे राहतील तर परिणाम काय होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर महायुतीचा उमेदवार कोण?

रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी राजू पारवे यांचे नामांकन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे या आज अर्ज दाखल करणार असून शक्तिप्रदर्शन देखील करणार असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आता शिवसेना उमदेवार राजू पारवे यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =