Accident Case: ट्रकची ऑटोला भीषण धडक, दोघे जण जागीच ठार. घटना सी सी टीव्हीत कैद.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)*

Accident Case : नागपूर तुळजापूर महामार्गांवर यवतमाळ जिल्यातील महागाव येथुन प्रवासी घेवुन निघालेल्या अॅटोला महागाव शहरा जवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळ नागपुरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भीषण धडक दिली. यामध्ये अॅटोतील एक महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या चाकाखाली ऑटो आल्याने मृतकांचा येवुन अक्षरशः चेंदा मेंदा झाले. ही अंगाला शहारे आणणारी घटना जवळच्या असलेल्या पेट्रोल पंपाच्या लावलेल्या सी सी टीव्हीत कैद झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतदेह चेंदामेंदा झाल्याने मृतकांच्या ओळख पटविण्याचा प्रश्न पोलिसांसमोर उभा झाला होता. पोलिसांनी चौकशी केली असता सदर मृतक महिलेची ओळख पटून तिचे नाव सत्वशिला रामा गायकवाड (वय७४ वर्ष) रा. लोहरा ता. महागाव असल्याची माहिती मिळाली तर मृत इसमाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

या अपघातात जखमी झालेल्या अॅटो चालक ज्ञानेश्वर ठोंबरे रा. कोठारी यास उपचारासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे.अपघात ग्रस्त ट्रक व अॅटो पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले.ट्रक चालक ओमप्रकाश बेदरकर याला अटक करण्यात आली असुन पुढील तपास महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, सागर अन्नमवार, सुरज काळे, नापोका वसीम शेख यांचेसह पोलिस कर्मचारी करीत आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.