PM Narendra Modi in Yavatmal: यवतमाळ मध्ये होणार पंतप्रधान मोदींचे दर्शन!
PM Narendra Modi in Yavatmal: 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा निश्चित झालेला आहे. 11 फेब्रुवारी 2024 ला मुलता पंतप्रधानांचे आगमन होणार होते परंतु भेट पुढे ढकलण्यात आली होती. नरेंद्र मोदी यवतमाळ – नागपूर मार्गावरील भारी गावात आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना मोदी संबोधित करणार आहे.
भव्य मेळाव्याची जय्यत तयारी.
या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकरात या मेळाव्याची जोरदार तयारी केली जात आहे. शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भारी गावाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जेसीबी मशीन ने या जागेच्या सपाटीकरणाला सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी 7 हेलिपॅड ची विमानतळावर व्यवस्था तर विशेष रस्त्यांची सोय देखील करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा मेळाव्याच्या तयारीला लागलेली आहे. 30 विविध समित्यांची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आल्या आहेत. या दौऱ्यानिमित्त राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री देखील मेळाव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंतप्रधान संबोधित करणार 2 लाखाहून अधिक महिलांना.
नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ भेटीमध्ये महिला बचत गटांवर लक्ष केंद्रित करणे, बचत गटाचे सक्षमीकरण करणे, बचत गटातील महिलांना अधिकाधिक सेवा प्रदान करणे, अशा प्रकारची एक सुसंगती पाहायला मिळणार आहे. राज्य सरकार या मेळाव्यासाठी मराठी, संस्कृत, इंग्रजी आणि हिंदी मध्ये कार्यक्रम पुस्तिका जारी करण्याची योजना आखत आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा बैठक घेतली. ज्यात जिल्ह्यातील मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच अमरावती जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सभेत सहभागी झाले होते.
यवतमाळच्या दौऱ्यावर मोदीजी चौथ्यांदा!
2004, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकी पूर्वीच्या दौऱ्यांसह मोदींचा यवतमाळला हा चौथा दौरा असणार आहे. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2004 मध्ये जिल्ह्याचा दौरा केला होता. पोस्टल ग्राउंड वर जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर 20 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आर्मी जवळील दाभाडी येथे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भेट दिली. त्यावेळी त्यांनी चाय पे चर्चा या कार्यक्रमातून देशभरातील लाखो शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.16 फेब्रुवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पांढरकवडा येथे महिला बचत गटांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्याकरिता ते सहभागी झाले होते.