परतवाडा आरटीओ, महसूल, पोलिसांच्या डोळ्यांवर पट्टी ?

परतवाडा आरटीओ, महसूल, पोलिसांच्या डोळ्यांवर पट्टी ?

ओव्हरलोड ट्रक बिनबोभाट; एकाच पासवर अनेक ट्रिप.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

परतवाडा आरटीओ : मेळघाटच्या पायथ्याशी शेत सपाटीकरणाच्या नंतर आता कृती आराखड्याच्या नावावर खदानीतून हजारो ब्रास मुरुमाची वाहतूक परतवाडा- अचलपूरसह परिसरात सुरू आहे. मुरूम घेऊन धावणारे ट्रक एकाच पासवर तीन ट्रिप अन् ओव्हरलोड धावत असताना महसूल पोलिस आणि आरटीओच्या डोळ्यांवरील पट्टी बरेच काही बोलणारी ठरली आहे.

चिखलदरातील बोराळानजीक शेताच्या खदानी तयार करण्यात आ. गौण खनिजासाठी शेत सपाटीकरण हा फंडा डोंगर पोखरून गौण खनिज तस्करांचे खिसे भरायला फायदेशीर ठरला होता. आता कृती आराखड्यातून जिल्हा प्रशासन मंजुरी देते. त्यावर सर्वच विभागाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. चोरी गेलेले गौण खनिज नंतर मोजता आले तरी ओव्हरलोड धावणारे शेकडो ट्रक कुणाच्या आशीर्वादाने धावतात? त्यांवर कारवाई का नाही?

असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शहरातील मिल कॉलनी स्टॉपवर गुरुवारी एमएच ०४ डीके ०७२१ क्रमांकाच्या या ओव्हरलोड मुरूम ट्रकची परवानगी तपासली गेल्याचे तहसीलदार संजय कुमार गरकल यांनी सांगितले.

आम्ही डोळे झाकतो, तू पुढून धाव !

बोराळा खदानीतून ओव्हरलोड ट्रक शहरातून भरधाव धावत आहेत अकोट – अंजनगाव-परतवाडा-बैतुल हा आंतरराज्य महामार्ग असून यावरूनच ही सर्व वाहतूक आहे. वाहतूक पोलिस, महसूलचे पथक, आरटीओ पथके याच मार्गावर दिसतात. मात्र डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीचा हा प्रकार साटेलोटे असल्याचा पुरावा देणारा ठरत आहे.

चिखलदराचा महसूल विभाग बेपत्ता?

शहरात नियमबाह्यरीत्या ओव्हरलोड मुरुमाचे ट्रक धावत असताना चिखलदरा महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रभारी तहसीलदारांच्या भरोशावर तालुक्याचा डोलारा सुरु आहे. चार दिवसांपूर्वी परिवीक्षाधीन तहसीलदार रूनय जयकुलवार रुजू झाले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ओव्हरलोड व गौण खनिज वाहतुकीचा परवाना संबंधित ट्रकचा आहे किंवा नाही, या संदर्भात माहिती घेऊन नसल्यास त्यांना नोटीस बजावण्यात येईल. – संजयकुमार गरकल, तहसीलदार, अचलपूर

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 8 =