इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.
इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी वयाच्या 25 वर्षात बिरसा मुंडा यांचे तैलचित्र संसदेच्या मध्यभागी लावल्या जाते.
अगदी वयाच्या 25 वर्षात त्यांच्या जन्मदिवशी झारखंड राज्य निर्माण होते.त्यांच्या नावाने विमानतळ कृषी विद्यापीठ अशा अनेक संस्था अगदी वयाच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामामुळे निर्माण होते. येवढे महान व्यक्तिमत्व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आहे, यांची जयंती इवळेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ईवळेश्वर येथे झेंडा पूजन तथा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ विष्णू उकंडे यांनी बिरसा मुंडा हे आदिवासीचे प्रेरणास्थान असून आदिवासी समाजाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सन्मान मिळून देण्याचे काम बिरसा मुंडा यांनी केल्याचे सांगितले,आदिवासींना सर्व क्षेत्रात प्रगती करायची असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले, मनुष्याच्या नावासमोर त्याची संपत्ती लिहिल्या जात नसून शिक्षण लिहिल्या जाते.
त्याचप्रमाणे शिक्षणामुळे आपले हक्क न्यायिक मार्गाने मान्य करून घेण्याचे सुद्धा ज्ञान मिळते, व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःला व परिवाराला उध्वस्त न करण्याचे आवाहन आदिवासी बांधवांना केले, यावेळी गजानन भाऊ राठोड सरपंच कविताताई राठोड,उपसरपंच उज्वलाताई कुडमते, सुनीता कुरसंगे,विनोद कुडमते नारायन कुडमते,राजेंद्र घाटे,अनिल आडे, विजय राठोड ,उत्तम बनसोड ,ऋषिकेश मडावी ,भालेराव राजू बंसोड तथा समस्त आदिवासी बांधव उपस्थित होते.