Murder Case: पत्नी व प्रियकराच्या सोबतीने पतीचा गळा दाबून हत्या.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने*

Murder Case: वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांची कामगिरी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

पोलिसांनी दोन तासात पत्नी व प्रियकर आरोपीस अटक.

पातुर:- बाळापूर पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तामसी येथे वीटभट्टी वरील मजुरांची पत्नी व तिचा प्रियकराच्या संगतीने पतीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना १८ मार्च सोमवार रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार तुंलगा खुर्द येथील प्रमोद जानकिरराम मेसरे वय३२ हे तामसी येथे वीटभट्टी वर मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

परंतु सोमवार रोजी झोपेत असतांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती परिसरात पसरली होती.परंतु प्राथमिक अवहाल वरून पोलिसांना तपास केला असता गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निदर्शनस येताच कसून चौकशी केली असता मृतक ची पत्नी मंगला मेसरे वय २७ व प्रियकर गोटू मेसरे २९ या दोघांनी गळा दाबून हत्या करण्यात आली.

आरोपी गोटू मेसरे हा मृतक चा चुलत भाऊ असल्याची माहिती देण्यात आली आहे.वाडेगाव पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांना संशय येताच त्यांनी योग्य दिशेने तपास करीत अवघ्या दोन तासात आरोपीला पकडून गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी यांना तत्काळ अटक करून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे करीत आहेत..

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seven − 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.