हस्तापूर पांदण रस्ताचेआ, MLA Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब*

हस्तापूर बाभुळगाव पांदण रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक उईके यांच्या हस्ते 1फेब्रुवारीरोजी करण्यात आले. या पांदण रस्त्याच्या दुतर्फा बाभूळगाव, मागसावंगी, हस्तापूर येथील जवळपास 50 शेतक-यांची शेती आहे. शेतीकडे जाण्यासाठी हाच एकमेव पांदण रस्ता आहे. पावसाळ्यात चिखलातून, दलदलीतून वाट काढताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातही शेतमालाची वाहतूक करणे फारच कठीण झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

हस्तापूर येथून बाभुळगाव येथे येण्याकरिता पावसाळ्यात चिखल व पाणी असल्याने विद्याथर्त्यांना चिखल व पाण्यातून वाट करीत यावे लागत होते. सदर रोडची मागणीचे निवेदन एक वर्षा अगोदर बाभुळगाव ,व हस्तापूर शेतकरी व नागरिकांनी MLA Ashok Uike यांना  दिले होते. गावातील नागरिकांच्या हितासाठी सदर पांदणीच्या कामाला प्राधान्य देऊन निश्चितच सोडविला जाईल असे आश्वासन त्यावेळी  आमदार यांनी दिले होते. याची पूर्तता करून 30लाख रुपये किंमतीच्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन वेळी सतीश मानलवार, नितीन परडखे, सुरेश वर्मा, हेमंत ठाकरे,अनिकेत पोहोकार, नगरसेवक शे.कादर, संजय राठी, मिलिंद नवाडे,अभय तातेड, प्रवीण चेंडकापुरे, सरपंच सारंग दातार, संजय मदने, तुषार गुप्ता, सोनू शर्मा, गोलू अलोन मयूर पिसे, आरिफ छवारे, निलेश दातार,शेख सलीम, योगेश अर्के, जयश्री चौधरी,रिता चौधरी, वनिता पेंदोर, चिकुला चांदेकर, प्रियंका चौधरी,छाया ठाकरे, संगीता शिवरकर,लताबाई चौधरी,निशांत चौधरी, विक्रम ठाकरे, अमोल चौधरी,तसेच हस्तापुर येथील महिला व नागरिक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seven + 18 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.