मौजा नरसाळा येथे Indian Constitution Day व विदर्भाचे रॉबिनहूड Shyamdada Kolam Jayanti निमित्त प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

मौजा नरसाळा येथे Indian Constitution Day व विदर्भाचे रॉबिनहूड Shyamdada Kolam Jayanti निमित्त प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

Indian Constitution Day: पेसा कायद्याची योग्य रित्या अमलबजावणी झाली असती तर पैसा मध्ये येणारे गाव हे सोन्याची लंका असते प्रा. डॉ. रवींद्र मडावी.

दिनांक २६/११/२०२३ रोजी मौजा नरसाळा येथे आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन व विदर्भाचे रॉबिनहूड Shyamdada Kolam Jayanti निमित्त प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन मा अरविंद ठाकरे साहेब सरपंच ग्रामपंचायत कुंभा यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा रामचंद्र आत्राम सर सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मा कु. सुवर्णाताई वरखडे यांनी आदिवासींची संस्कृती व गोत्र पद्धती बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मा प्रा. डॉ. रवींद्र मडावी सर यांनी पेसा कायद्याची सखोल अशी माहिती देत सांगितले की पेसा कायद्याची योग्य रित्या अमलबजावणी झाली असती.

तर पैसा मध्ये येणारे गाव हे सोन्याची लंका असते, आदिवासींना पेसा कायदा सरकारने त्यांची जबाबदारी असतांनाही कधीही समजावून सांगितला नाही त्याच्या तरतुदींच्या अमलबजावनीसाठी कार्यशाळा घेतल्या नाही त्यामुळे पेसा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राची प्रगती झाली नाही. असे मोलाचे व महत्वाचे मार्गदर्शन डॉ. मडावी सरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अरविंद सिडाम संस्थापक आदिवासी जनजागृती युवा संघटना यांनी केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा प्रभात कनाके सर गावचे सरपंच संगीत म्हरस्कोल्हे व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संघटनेचे शाखा अध्यक्ष मा लक्ष्मण कनाके होते. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कू. पल्लवी उईके हिने केले व आभार प्रदर्शन गोपाळ उईके यांनी केले. त्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता संघटनेचे पदाधिकारी आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरंगाणा राणी दुर्गावती महिला संघटना लक्ष्मण कनाके , ज्ञानेश्वर दडांजे, रुपेश दडांजे, किशोर सुरपाम, सचिन सिडाम, धनंजय तोडासे, भारत सोयाम, विकास मरस्कोले, मारोती तोडासे, गोपाळ येरचे, सतीश कोवे, सुनील टेकाम, भाविक कोयचाडे, महिंद्रा उईके, शंकर केराम, सुशांत सुरपाम, शिवम कुडमेथे, विलास टेकाम, अमोल उईके, रोशन सोयाम कैलास उईके.

गोपाळ उईके अजय आत्राम, राकेश टेकाम, शंकर किनाके, सतीश मरस्कोले महिला संघटना पल्लवी उईके, ऐश्वर्या सुरपाम,संजीवनीताई उईके, बेबीताई तोडासे,भाग्यश्री कीनाके, शालूताई कुठमेथे, मीनाक्षी मरस्कोले, अनुसयाताई परचाके, सोमित्राताई सिडाम, वंदनाताई तोडासे, प्रतिभाताई सोयाम, तुळसाताई कुळसंगे, मनीषा चिकराम, प्रतिभाताई चिकराम,
तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 5 =