Maratha Reservation: दिनांक २३जानेवारी २०२४ रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, मराठा, बारा बलुतेदार, भटके विमुक्त यांच्या संयुक्त शिष्टमंडळाची भेट घेतली, दरम्यान Haribhau Rathod यांनी मराठा समाजाचा जटिल प्रश्न कायमस्वरूपी सविधानिकरीत्या निकाली काढायचा असेल तर भारतरत्न कर्पूर ठाकूर फार्मूला वापरावा लागेल, जेणेकरून मराठ्यांनाही आरक्षण मिळेल आणि ओबीसी आरक्षणाला धक्काही लागणार नाही अशी मागणी करण्यात आली, यावर सकारात्मक चर्चा झाली असून या संयुक्त शिष्टमंडळाच्या वतीने मागण्याचे निवेदन पत्र देखील आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आले.