Manoj Jarange Patil: Maratha Arakshan मंजूर, अध्यादेश निघणार यवतमाळात शिवसेना (उबाठा) कडून जल्लोष साजरा.

Manoj Jarange Patil: Maratha Arakshan मंजूर, अध्यादेश निघणार यवतमाळात शिवसेना (उबाठा) कडून जल्लोष साजरा.

यवतमाळ: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले Maratha Arakshan आंदोलन आज शासनाच्या अध्यादेशामुळे संपले आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेते Manoj Jarange Patil यांनी महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मंजूर केले असून आता अध्यादेश निघणार असल्याने मराठा आंदोलन संपल्याची घोषणा केली ही माहिती शनिवारी सकाळी त्यांनी दिली. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे.

दरम्यान आज सकाळी यवतमाळ येथे दत्त चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मराठा आरक्षण संबंधात सर्व मागण्या मंजूर झाल्याने जल्लोष साजरा करण्यात आला,यावेळी शिवसेनेचे सर्व आघाड्यांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.यावेळी शिवसेना जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी माध्यमांना संबोधित करताना मराठा आरक्षणावर राज्यशासनाने जे निर्णय घेतले आहे त्याचे स्वागत करीत म्हटले की,या आंदोलनात जरांगे सारखा मोठा नेतृत्व मिळाला आहे.

अखेर सरकारला झुकावे लागले आहे,मुंबईच्या वेशीवर येवूनच मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या,शासनाने पुढे हीच प्रामाणिकता कायम ठेवावी व विधानसभेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून याला कायदेशीर स्वरूप प्राप्त करवून द्यावा, यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध बोलणारे ऍड.सदावर्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ताशेरे उडविले. उल्लेखनीय म्हणजे मराठा आंदोलनाचे प्रमुख आंदोलन व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी उपोषण सुरू केले होते.

जरांगे यांनी मराठा आरक्षण संदर्भात सर्व मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत दिली होती. सरकारने आज रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा, मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला होता.दरम्यान आज सकाळी मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केली आहे.

यात कुणबी कागदपत्र मिळालेल्या व्यक्तीसह संबंधितांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ देण्याचा अध्यादेश काल रात्री शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. सोबतच मनोज जरंगे यांच्या सर्व अटीही सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समुदायात आनंदाची लाट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 2 =