Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नवीन नाव अन् नवा ट्विस्ट, कोण आहेत फडणवीसांचे ते निकटवर्तीय ? महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा निकाल आल्यानंतर महायुतीने बहुमतापेक्षा कित्येक तरी जास्त जागा पटकावले आहे पण राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि नवा कॅबिनेट यावर आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस लोटूनही राजकारणाचा काथ्यकूट सुरू आहे.यादरम्यान सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी यानंतर मुख्यमंत्री पद भाजपला देवून पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला,तरीही आता भाजपचे राज्यातील दिग्गज नेर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना त्यांच्यासमोर मुख्यमंत्री पदावर बसण्यापूर्वी या खुर्चीला घेवून नवे आवाहन उभे झाले आहे.कारण फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मातब्बर राजकारणी यांचे नाव आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले आहे.एकूणच या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव CM साठी चर्चेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक निकाल 23 नोव्हेंबरला लागून आता 9 दिवस झाले,महायुतीने जनादेश घेत बहुमत मिळविला.परंतु महायुती कडून नवीन सरकार आणि मुख्यमंत्रीपदासाठी अधिकृतपणे अद्यापही नाव जाहीर झाले नाही.फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवीन सरकारवर महायुती मध्ये पेच अडकल्याचे दिसत आहे.कारण भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरीही महायुतीकडून त्यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही.त्यात आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री पदासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत येताच ट्विस्ट वाढला आहे.विशेष म्हणजे आमदार चव्हाण हे फडणवीसांचे खूप निकटवर्तीय आहेत.
फडणवीस यांनीच आ. चव्हाण यांना दिल्लीत बोलाविले.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र चव्हाण यांना शुक्रवारी दिल्लीतील महायुती नेत्यांच्या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. यावेळी आ.चव्हाण हे पालघर दौरा सोडून दिल्लीत पोहोचले.यावेळी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली.यात यंदा महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया होईल, यावर चाचपणी घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सूचना अन् यात नवे मुख्यमंत्री म्हणून आमदार रवींद्र चव्हाण यांचे नावावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप घेण्यात आले का? असेल तर रवींद्र चव्हाण यांना सीएम नवे म्हणून संधी मिळणार का,यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहे.
भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही.
राज्याच्या राजकारणात महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आमदार रवींद्र चव्हाण यांचा नाव समोर येताच नवीन ट्विस्ट वाढले असताना दुसरीकडे भाजप राज्याचा गृहमंत्री पद सोडायला तयार नसून दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खाते घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्याकडून गृहमंत्री पद घेण्यासाठी ताकद लावली जात आहे.दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर शिंदे हे आपल्या मूळ गावी परतले.तेथे त्यांची तब्येत बिघडली, मात्र जे आमदार चव्हाण यांचे नाव चर्चेत आले ते दिल्लीतून परतताच थेट शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी गेले, यामुळे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर महायुतीत शिक्कामोर्तब झाले तर चव्हाण यांना गृहमंत्री किंवा इतर महत्त्वाचे खाते मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे.
दरम्यान दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये असलेली शिवसेनेकडून नवीन मंत्रिमंडळात 12 मंत्री पद आणि विधानपरिषदेचे सभापती पद मिळावा यासाठी आपली यादी देण्यात आली आहे. सोबतच महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात पालकमंत्री पद देताना शिवसेनेला योग्य वाटा देऊन सन्मान राखावा असा आग्रह करण्यात आला आहे.