Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत पराभवाचे चटके सहन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पुन्हा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नवे खिंडार पाडण्याची रणनीती आखली जात आहे की काय,अशीच शंका सध्या या दोन्ही पक्षात आणि राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा झालेले एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या डिनर पार्टीला आमंत्रित करण्यात आले आहे.{MP Shrikant Eknath Shinde Invite Mla For Dinner In Dellhi}.
दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून नवनिर्वाचित आणि नवोदित आमदारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.यानिमित्ताने महायुतीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली निवासात विशेष डीनर पार्टीचे आयोजन केले.
यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले.यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 10 आमदार इतर आमदारांसह या डिनर मध्ये सामील झाले.
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदारांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी डिनरचे आमंत्रण दिलेले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा 78 असे आमदार आहेत,जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.
यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे एकूण 10 आमदार,काँग्रेसचे 6 आणि एनसीपी पक्षाचे 4 नवोदित आमदार आहेत.हे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार महायुतीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला निमंत्रण मिळाल्यानंतर उपस्थित राहणार असल्याची चर्चा सुरू होती.
यामुळे महविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाकडून नवी रणनीती महायुती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अंतर्गत मतभेद पाहता आखण्यात तर आलेली नाही ना, याबाबत सध्या राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत आहे.{Mahayuti Government}
उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलेल्या 78 आमदारांसाठी आणि इतर सर्व आमदारांसाठी विधानसभा सचिवांकडून दिल्लीमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
{Assembly Secretary Organized Workshop For New Elected MLA’s In Delhi} हे सर्व आमदार दिल्ली येथे पोहोचणार होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 आमदार आणि महाविकास आघाडीतील इतर नवोदित आमदारांचा दिल्लीमध्ये सामील होण्याचा कार्यक्रम आखण्यात आला.
याच दरम्यान खा. श्रीकांत शिंदे यांच्या डिनरला उपस्थित राहण्याचे निमंत्रण या सर्वांना मिळाले.यात शिवसेना युबीटी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार गजानन लवाटे,आ.सिद्धार्थ खरात,आ.संजय देरकर.आ.अनंत बाळा नर.आ.हारून खान,आ. महेश सावंत,आ.वरून सरदेसाई,आ.मनोज जामसुतकर,आ.प्रवीण स्वामी आणि आ.बाबाजी काळे या 10 आमदारांचाही समावेश होता.
शिवसेना-भाजपमध्ये ऑल इज वेल नाही का ?
उल्लेखनीय म्हणजे महायुतीमध्ये असलेले शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि स्वतः एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा सध्या राजकीय पणे अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात एकूण 49 आमदारांची संख्या आहे.
मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या संदर्भात ते सध्या पक्षांतर्गत बंडाळी करणार असल्याचीही राजकीय चर्चा सुरू आहे.अद्याप याला राजकीय दुजोरा नाही.
मात्र महायुतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात मुख्यमंत्री ते कॅबिनेट खाते, पालकमंत्री पदावरून मोठ्या प्रमाणात अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येताना दिसला,त्यामुळे महायुती मध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही ऑल इज वेल नसल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे भाजपकडून शिंदे गटात मंत्री उदय सामंत यांना सरकारात प्राधान्य देण्यात येत आहे.राजकीय सूत्रानुसार भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय दडपण आणण्याचा हा एक पॉलिटिकल असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics महायुती मधील शिंदे शिवसेना ची नवे रणनीती आहे का.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या अस्वस्थते मागे दुसरे कारण म्हणजे त्यांच्या पक्षात असलेले दिग्गज नेते उदय सामंत यांना समर्थन देणारा आमदारांचा मोठा गट पक्षात असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा असलेले एकनाथ शिंदे यांच्या गोटात पहिल्यांदाच यानिमित्ताने अस्वस्थता दिसत आहे.
त्यामुळे भविष्यात पक्षांतर्गत बंडाळी होताच पक्षात डॅमेज कंट्रोल व्हावा,आणि आपल्या पक्षातील आमदारांचे संख्याबळ आणि इतर विरोधी पक्षाचे आमदार यांचाही समर्थन मिळावा,आणि यातून नवीन राजकीय रणनीती आखणे सोपे व्हावे,याच नव्या रणनीतीतून तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात डावपेच आखण्याचे काम तर होत नाही ना अशी शक्यता दिल्लीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या द्वारे आयोजित डिनर पार्टी निमित्ताने वर्तवली जात आहे.