Maharashtra Politics : राज्यात लवकरच आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात डिसेंबर एंडिंग मध्ये एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा भूकंप एनसीपी शरद पवार गटाला मोठा धक्का देणारा ठरणार आहे.या संबंधात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. राष्ट्रीय सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार नुकतेच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला.
यात कॅबिनेटमध्ये 43 मंत्र्यांचा समावेश व्हायला हवे होते,मात्र रविवारी फक्त 42 मंत्र्यांनीच पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मंत्रीपदाची ती एक जागा कुणासाठी सोडण्यात आली, यावर विविध तर्क लावले जात असताना,आणि राजकीय गूढ कायम असतानाच आमदार मिटकरी यांचे विधान या संबंधात महत्त्वपूर्ण मानले जात आहे. यामुळे ती जागा कुणासाठी सोडण्यात आली हे स्पष्ट झाले आहे.
महायुती सरकारात ती एक जागा नेमकी कुणासाठी सोडण्यात आली,आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाही, याबाबत ही विधानपरिषद सदस्य मिटकरी यांनी भाष्य केले आहे. त्यांचे हे भाष्य शरद पवार पक्षासाठी मोठा धक्का राहणार हे निश्चित झाले आहे.
नेमकी काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी.
रविवारी नागपूर येथे राजभवन येथे महायुती सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होऊन 41 मंत्र्यांच्या शपथविधी पार पडला. येथूनच नागपूर हिवाळी अधिवेशनाची सुरुवात यादरम्यान आमदार मिटकरी यांना माध्यम प्रतिनिधी छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने संदर्भात प्रश्न विचारताच ते म्हणाले की, नाराजी कसली असेल हे माहीत नाही?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 41 आमदार या निवडणुकीत निवडून आले,
या सरकारात पक्षाला आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळाली आहे,मात्र त्यामुळे ज्यांना मंत्रीपद मिळाली नाही त्यांना नाराजी असणे साहजिक आहे. आमदार मिटकरी म्हणाले की मला माध्यमातूनच माहिती मिळाली की पक्षातील काही ओबीसी बांधवांमध्ये या संबंधात नाराजी आहे, ही नाराजी दूर करून त्यांना पक्षाकडून राज्यसभेवर पाठवले जातील अशी माहितीही माध्यमांनीच दिली आहे, नाराजी असेलच तर ती पक्ष पातळीवर दूर केल्या जाते,
फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नव्हे तर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांमध्ये अनेक नेते आहेत ज्यांना मंत्री पद मिळाले नाहीत. त्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेमध्ये दीपक केसरकर आहेत, त्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली नाही त्यामुळे नाराजी असणे साहजिकच आहे.
नाराजांची बोळवण केल्या जाईल.
येत्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये राज्यातील महामंडळामध्ये नवीन नियुक्ती होणार आहेत यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्रित येऊन चर्चा करतील. महामंडळांवर जे राजीनामे देतील, त्यांच्या जागी जे नाराज आहे,यासाठी त्यांची बोळवण केली जाईल.असे मला वाटते. महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रित राहून पुढील पाच वर्ष सरकार चालू होतील. यासाठी नानाजी पेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं असे अमोल मिटकरी म्हणाले.
तो मंत्रीपद नेमका कुणासाठी खाली ठेवला?.
माहिती सरकार एक मंत्रिपद खाली ठेवण्यात आला आहे आणि ते नेमका कोणासाठी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांसाठी हा रिक्त पद आहे का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधी विचारताच, आमदार मिटकरी यांनी राजकीय भूकंप होईल या अर्थाने भाष्य करीत म्हटले की, ते रिक्त मंत्रीपद शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी खाली ठेवण्यात आला आहे, असं थेट मत व्यक्त करताना आ.मिटकरी म्हणाले की, मागील महायुती सरकारतही अशाच प्रकारे एक मंत्रिपद त्यांच्यासाठी खाली ठेवण्यात आला होता, त्यांनी त्यावेळी फार विचार केला होता,
यानंतर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्याने त्यांना असं वाटले की आपल्याला आता तिथे जाण्याची गरज राहणार नाही, पण आता जी परिस्थिती आली आहे की मला असं वाटते की ज्याप्रकारे बोलल्या गेले की, योग्य व्यक्ती योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेतील. त्यामुळे तुम्ही आता बघाल की “वन डाऊनला जो प्लेयर खेळण्यासाठी येतो” त्याच्यासाठीच ही जागा रिक्त आहे,असा उत्तर आमदार मिटकरी यांनी दिला.
ते म्हणाले की मला आतापर्यंत जी माहिती आहे,ते लवकरच येथे येतील. सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे,त्यामुळे योग्य वेळ आहे,आता योग्य निर्णय हा डिसेंबरच्या शेवटपर्यंत होईल आणि मंत्रिमंडळात एक मंत्री पद खाली ठेवण्यामागे हेच एक कारण आहे की यावर योग्य व्यक्ती येईल.