Maharashtra Congress New President : तळागाळातून समोर आलेले नेते आता महाराष्ट्र काँग्रेस प्रेसिडेंट ! जाणून घ्या कोण आहेत Harshwardhan Sapkal !

Maharashtra Congress New President : महाराष्ट्रात आता काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.नाना पटोले यांच्याकडे असलेली ही जबाबदारी आता सपकाळ यांना सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्याने पक्षाने तळागाळातील माणसाला नेतृत्व दिले आहे.अशी राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.सपकाळ यांना मानववादी विचारांचा नेता मानला जातो. हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत हे आपण जाणून घेवू या.{Harshwardhan Vasantrao Sapkal Zilla Parishad Member to state president}

Maharashtra Congress New President : राष्ट्रीय राजकारणात यापूर्वी मोठी जबाबदारी पेलली.

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल झाले आहे. नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद परत घेवून त्यांच्या जागी महाराष्ट्र काँग्रेसची धुरा अगदी सर्वसामान्य समोर आलेले आणि तळागाळात काम करणारे हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचा जिल्हा परिषद सदस्यपद ते प्रदेशाध्यक्ष असा आतापर्यंत राजकीय प्रवास सुरु आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.त्यांचे काम पाहून त्यांना राहुल गांधी यांनी आपल्या टीम मध्ये सामील केले होते.त्यामुळे त्यांनी 14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये काम केले.

आता त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले आहे.प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद होते. सपकाळ यांची राजकीय कारकीर्द ही जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून समोर आली आहे.

  • 1999 ते 2002 या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते
  • हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 बुलढाण्याचे आमदार होते.
  • 2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं होतं, पण त्यांना पराभव पत्करावा लागलं.
  • आपल्या आमदारकीच्या काळात सपकाळ यांनी आपल्या मतदार संघात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला होता.
  • महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर चालून ग्रामस्वराज्य निर्मितीत सपकाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांचा शिक्षण आणि अल्प राजकीय,सामाजिक परिचय

  • युवावस्थेपासूनच गाडगे महाराज,तुकडोजी महाराज व गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून हर्षवर्धन सपकाळ हे परिचित आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी घेतली. शेतकरी कुटूंबातून असलेले सपकाळ हे सामाजिक कामातून राजकीय क्षेत्रात समोर आले.भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना NSUI माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रीय झाले. यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष असताना युवकांसाठी सामाजिक शिबिराचे सातत्याने आयोजन त्यांची फार मोठी उपलब्धी आहे.
  • आता पर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे त्यांचे सक्षमीकरण साठी 25 वर्षांपासून प्रयत्न राहिले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.
  • एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.
  • काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाब चे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
  • अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडली.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

sixteen − 6 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.