Lok Sabha Elections 2024: मनसे – भाजप यांची भाऊबंदी?

Lok Sabha Elections 2024: मनसे – भाजप यांची भाऊबंदी?

Lok Sabha Elections 2024: महायुतीला आता राज ठाकरेंची ताकद मिळणार का?

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीमध्ये अमित शहा सोबत बैठक होणार असल्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी कालच दिल्लीमध्ये राज ठाकरे रवाना झाले आहेत. महायुतीला मनसेचे इंजन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

मनसे महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना कोणत्या जागा मिळू शकतात?

1. राज ठाकरे हे दक्षिण मुंबईच्या जागेसह दोन जागेंसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे जर युती झाल्यास मनसेला एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.
2. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
3. लोकसभेची जागा न मिळाल्याने राज्यसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे.
4. विधानसभेत समाधानकारक जागा मिळण्याचे आश्वासन देखील मिळू शकते.

दक्षिण मुंबईत ठाकरेंचं पारडं जड का?

दक्षिण मुंबईत मनसेकडून खासदार अरविंद सावंत यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू होती. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मुंबई जिल्ह्यातील वरळी विधानसभा मतदारसंघ, भायखळा विधानसभा मतदारसंघ, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ, शिवडी, कुलाबा, मलाबार हिल्स विधानसभा मतदारसंघ अशा तब्बल सहा विधानसभांचा समावेश होतो. अशातच दक्षिण मुंबईतील मराठी भाषिक परिसर जास्ती असल्याने एकंदरीत ठाकरेंचं पारडं जड असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे भाजप एकत्र.

मनसे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्याची चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही भूमिका घेतली जात आहे, असेही म्हटले आहे. राज ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. भाजपने देखील नेहमीच हिंदुत्वाचा हिरवा झेंडा घेऊन मिरवला आहे, त्यामुळे ही युती होत असल्याची दाट शक्यता आहे.

मनसे महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का?

महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचे टाईम टेबल बनलेले नाही आणि त्यातच मनसे महायुतीत प्रवेश करण्याची शक्यता वाढते आहे. मग आगामी लोकसभांसाठी एक ते दोन जागा मनसेला सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना तयार आहे का? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. मात्र, महायुतीसोबत लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचा ही पर्याय असेल त्यासाठी महायुतीकडून मनसेला महायुतीच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव भाजपने दिला परंतु मनसेने हा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळला आहे.

मनसे भाजप युतीच्या चर्चेवरील रोहित पवारांचे वक्तव्य.

राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावे असे रोहित पवारांनी वक्तव्य केले आहे. “भाजप फक्त गरजेपुरता इतर पक्षांना आपल्या सोबत घेतो आणि गरज संपली की दूर करतो. ” याचा राज ठाकरे यांनी विचार करावा असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तर सुधीर मुनगंटीवार यांचे मनसे भाजप एकत्रीकरणावर विधान.

“जर राज ठाकरे महायुतीत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्माचा विजय व्हावा, राष्ट्रहिताचा विजय व्हावा आणि ही भूमिका घेऊन मनसेने भाजपाला पाठिंबा देत युती केली तर यामध्ये राज्याचे आणि देशाचे हित आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + eleven =