यवतमाळ: दारव्हा रोडवरील तिवसा शेतशिवारातील गावठी दारूवर एलसीबीच्या (Local Crime Branch) पथकाने चाड टाकून ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली. लक्ष्मण सोमा नेताम (५९) असे आरोपीचे नाव आहे. लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिवसा शेतशिवारात गावठी दारू काढली जात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली.
त्यावरून पथकाने १५ ऑक्टोबर रोजी तिवसा शेतशिवारात सापळा रचून गावठी दारूवर धाड टाकली. यावेळी गावठी दारू गाळण्यासाठी उपयोगी येणारा मोहमाच सडवा, साहित्य तसेच गावठी दारू असा एकूण ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एपीआय गणेश बनारे, बबलू चव्हाण, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी यांनी केली.