महाराष्ट्राला देशात पहिली एल एन जी गॅसवर चालणारी पहिली बस (LNG Bus) धावण्याचा बहुमान मिळालेला आहे.एलजी गॅस लिक्विड (LNG Gas Liquid)वर धावणारी महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाची (MSRTC)एसटी बस देशात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे.
LNG गॅस किट वर आधारित 5 एलएनजी बसेस एस टी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बस गाड्यांच्या ताफ्यात सामील करून,देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात एलएनजी बसेसमधून एमएसआरटीसी.द्वारे नासिक येथे प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे.
सध्या ह्या LNG एसटी बसेस नाशिकच्या रस्त्यांवर धावताना दिसत आहे. लवकरच महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व विभागांना एलएनजी गॅस लिक्विड वर चालणाऱ्या एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येईल.
एसटी महामंडळाकडे असलेल्या डिझेलवर चालणाऱ्या एसटी बस मध्येच एल एन जी लिक्विड गॅस किट बसविण्यात आले आहे.यामुळे डिझेल एवजी एलएनजी गॅस लिक्विड इंधन किट लावलेल्या एसटी बसेसमध्ये रूपांतर झाले आहे.आता ह्या एलएनजी एसटी. बसेस देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात नासिक मध्ये धावताना दिसत आहेत.
काय आहे एल एन जी {LNG}इंधन.
आता महाराष्ट्रात एम एस आर टी सी कडून LNG लिक्विड गॅसवर चालणाऱ्या एसटी बसेस सुरू झाल्याने सर्वांना प्रश्न पडला आहे की नेमके LPG Gas नंतर हे LNG इंधन आहे तरी काय? तर थोडक्यात याबाबत जाणून घेऊया.
LNG म्हणजे Liquid Natural Gas (लिक्वीड प्राकृतिक गॅस).ही प्राकृतिक गॅस ची अवस्था असते. याला तापमान बदलून तरल अवस्थेमध्ये आणल्या जाते.एल एन जी इंधन प्राप्त करण्यासाठी या प्राकृतिक गॅसला 207 डिग्री फेरेनहाईट तापमानावर गरम करून 162°c वर थंड केल्याने हा प्राकृतिक गॅस तरल इंधनचा रूप घेतो.वरील तापमानावर हा प्राकृतिक गॅस तरलव्यवस्थेत आल्यानंतर याचा भार हा गॅस अवस्थेतून 600 गुना कमी होतो एकूणच एलएनजी द्रविकरण सुविधेतून इंधन बनविण्यात येते.
याचा आधुनिक युगात ऑटोमॅटिक इंधन रूपात वापर केला जातो यामुळे कमी कार्बन फुट प्रिंट असतो,सोबतच एक स्वच्छ इंधन पर्याय मानला जातो.हा पर्यावरण सुरक्षेसाठी महत्त्वाचेसुद्धा आहे.एलएनजी उत्पादन इतर इंधन उत्पादनापेक्षा कमी खर्चात तयार होतो.
आधी नाशिकमध्ये दिल्या 13 E-बसेस.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून सर्वात पहिले नाशिक विभागाला एलएनजी किट लावलेल्या 5 बसेस देण्यात आले असून यापैकी दोन गाड्या नाशिक-धुळे, आणि तीन पैकी प्रत्येकी एक एलएनजी एसटी बस शनिशिंगणापूर अहिल्यानगर आणि पाचोरा दरम्यान प्रवासी घेवून धावत आहेत. या एसटी बसेस ना विल्होळी पंपावरून लिक्विड गॅस इंधन पुरविण्यात येत आहे.
यापूर्वी नाशिक मध्ये सुरू झाल्या होत्या 13 E-ST बसेस.
विशेष म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रात पहिल्यांदा नाशिक येथे महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या ई-बसेस {E-BUS} देण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात 6 आणि दुसऱ्या टप्प्यात 7 असे मिळून एकूण 13 पुरवठा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता येथून एलएनजी इंधन वर चालणाऱ्या बस सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात एसटी महामंडळ प्रवासी सेवा देतानाही नेहमी नुकसानीत असल्याचे म्हटले जाते.यापूर्वी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन,कोरोणा महामारी,वाढता इंधन आणि मेंटनेंस खर्च यामुळे महामंडळ डबघाईस आला होता.मात्र मागील काही महिन्यापासून एसटी महामंडळाचा नफा वाढला आहे.
आता महाराष्ट्रात एमएसआरटीसी कडून डिझेल एवजी सर्व ठिकाणी एलएनजी गॅस इंधन वर एसटी बसेस धावल्या, तर डिझेल आणि एसटी बस उपकरणांवर महागाईची मार कमी होइल,कारण एलएनजी इंधन स्वरूपात महामंडळाला नवा पर्याय मिळाला आहे यामुळे एसटी महामंडळ फायदात येऊ शकते.
कारण एलएनजी बस कमी खर्चावर जास्त किलोमीटर एवरेज देत असल्याने इंधन खर्च वाचणार आहे.सोबतच एस टी महामंडळ पर्यावरण रक्षणात ही योगदान देईल असे विशेषज्ञांचे यांचे मत आहे.