Kinhi Yavatmal: ‘Shasan Aaplya Dari’ कार्यक्रमाला अलोट गर्दी, लाभार्थ्यांना आठ महिन्यांत ६०१ कोटी.

Kinhi Yavatmal: ‘Shasan Aaplya Dari’ कार्यक्रमाला अलोट गर्दी, लाभार्थ्यांना आठ महिन्यांत ६०१ कोटी.

Kinhi Yavatmal: राज्यात १ एप्रिलपासून Shasan Aaplya Dari हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १६ लाख २५ हजार लाभार्थ्यांना ६०१ कोटींच्या लाभाची रक्कम वाटप करण्यात आली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला सुमारे ५० हजारांवर लाभार्थ्यांनी गर्दी केली होती.

यवतमाळकरांचे शिक्षण, रोजगारासह आरोग्याबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. नागपुर-जुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत किन्ही येथे आयोजित कार्यक्रमासाठी सोमवारी सकाळपासूनच लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. दुपारी १२.३० पर्यंत हा परिसर गर्दीने फुलून गेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी ३:४५ च्या सुमारास कार्यक्रमस्थळी आगमन झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड होते. मंचावर खासदार भावना गवळी, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उकि, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार इंद्रनील नाईक, प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार.

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध शासकीय योजनेचे प्रमाणपत्र तसेच लाभाचे धनादेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनादेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कृषी अवजारे तसेच ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

कार्यक्रमस्थळी शासकीय विभागांची ५४ दालने उभारण्यात आली होती. या दालनातून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचेही नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या वतीने एक हजार ७०० पदासाठी युवकाच्या मुलाखती घेण्यात आल्या.

दरम्यान, स्थानिक कलावंत गजानन वानखडे व संचाने पोवाडे तसेच मराठी गीताच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंगला माळवी आणि अमीन चव्हाण यांनी केले. आभार अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + two =