धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता Kailash Fad ने केले कनेरवाडी गावात बंदुकीतून फायर.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती कार्यकर्ता असलेला कैलास फड याने हवेत फायरिंग केल्यानंतर त्याला परळी पोलिसांनी अटक केली होती.त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशानंतर मात्र कैलास फड याला अवघ्या 24 तासात जामीन मंजूर झाला आहे.विशेष म्हणजे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी कणेरवाडी गावात खुलेआम हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड याचा व्हिडिओ एक्स वर पोस्ट करीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थावर प्रश्न उपस्थित केला होता.यानंतरच पोलिसांनी कैलास फड याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत त्याला अटक केली होती.मात्र त्याला आता अवघ्या 24 तासांत जामीन मंजूर झाला आहे.
ब्रेकिंग
हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता . या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात… pic.twitter.com/dlOjd5xv1k
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 24, 2024
आधीच तापलेल्या राजकारणात मुंडे यांचा एक कार्यकर्ता फरार तर दुसऱ्या कार्यकर्त्याला लगेच जामीन.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामुळे अख्ख्या महाराष्ट्रात राजकारण तापला आहे.संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचे आरोप होत आहेत, पण सध्या वाल्मिक कराड फरार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण केले असून गुन्हेगारीत राजकीय लोकांचा पाठबळ यावरून त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
जोपर्यंत संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि मंत्री धनंजय मुंडें यांच्या पदाचा सरकार राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आपण बीडमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिलेला आहे.या आंदोलनादरम्यानच बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असलेल्या कनेरवाडी येथील कैलास फड नावाच्या व्यक्तीचा बंदुकीतून हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी एक्स वर द्विट केला होता.या व्हिडिओची दखल घेत कैलास फड याच्या विरोधात परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
त्याला न्यायालयात हजर केल्यावर कैलास फड याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र यानंतर कैलास फड याला जामीन मिळाला आहे. विशेष म्हणजे हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर जामीन व सुटलेला आरोपी कैलास फड हा राज्य सरकारात कॅबिनेट मंत्री आणि परळी मतदारसंघाचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे.
Kailash Fad च्या जामिनानंतर दमानिया पुन्हा आक्रमक.
उल्लेखनिय म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र सरकार तसेच विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.यामुळे राजकारण मोठ्या प्रमाणात तापला आहे.कारण सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असलेल्या वाल्मीक कराड यांच्यावर या खून प्रकरणी आरोप होत आहे, मात्र या घटनेनंतर वाल्मीक कराड हा सध्या फरार आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून,जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात फरार असलेल्या कराडला अटक करण्यात येत नाही आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आपण आक्रमक आंदोलन करणार असा इशारा दमानिया यांनी दिला होता.
नेमके याच दरम्यान त्यांनी कनेरवाडी गावातील कैलास फड याचा हवेत गोळीबार करताना व्हिडिओ पोस्ट करून बीड आणि परळी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले होते, यानंतर अटक झालेल्या फड याला जामीन मंजूर झाल्याने आणि तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याने या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणखी आक्रमक होताना दिसत असून ते पुढे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.