Kaam Band Aandolan: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद.
जिल्हा शल्य चिकित्सकांसह आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन.
Kaam Band Aandolan: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एनयुएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायासेजन करावे, यासह अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, ह्या मागणीसाठी बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कृती समितीच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, आश्वासनाशिवाय शासनाने काहीच केले नाही. शेवटी १६ ऑक्टोबर रोजी पासून एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन नागपूर येथे करण्यात आले होते. तसेच १७ ते २३ ह्या कालावधी जिल्हास्तरीय आंदोलन पार पडले.
तरीसुद्धा शासनाने अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलीच नाही. शेवटी बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. एनएचएममध्ये मागिल १५ वर्षांपासून कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. कोरोनाच्या महामारीत सुद्धा कर्मचान्यांनी नियमित सेवा बजावली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एनयुएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे समायोजन लवकरच करू, असे आश्वासन देण्यात आले. होते. मात्र, त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. वेळोवेळी दिलेल्या निवेदनासह आश्वासनाची पूर्तता शासनाने केली नसल्यामुळे कंत्राटी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंदोलनात संतोष राठोड, दीपा टिपले, मंगेश वडेवर, पंकज गुल्हाने, सचिन अजमिरे, सुधीर उजवणे, विनेश पाटील, धम्मदीप गायकवाड, माणिक राठोड, अतुल तुपटकर, राज गजभिये, स्वप्नील पवार, राहुल चौधरी, सचिन घोबाडे, स्वानंद बोकारे, रागिणी ठाकरे, वर्षा चौधरी, प्राजक्ता बन्सोड, रंजिता बावणे, मनीषा राऊत यांच्यासह इतरही कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.