मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पात्र करत शिवसेना त्यांना देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज धुळे शहरातील जुनी महानगरपालिके समोर विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र असून खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून सरकारचा जोरदार निषेध केला जात आहे. धुळ्यात देखील युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत त्यांच्या पोस्टरला Jode Maro Andolan केले.
यावेळी जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचा विजय असो’, ‘उध्दव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘ या ‘गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’,’पन्नास खोके, एकदम ओके, आवाज कोणाचा शिवसेनेचा’, अशी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी युवा सेनेचे हरीश माळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. तो संविधान विरोधी असून बेकायदेशीर आहे आणि या निकालाची आधीच मॅच फिक्सिंग मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यामध्ये झाली होती असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.