महिलांनी मुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री यांच्यासह मानले माजी खासदार Haribhau Rathod यांचे आभार!
महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या अखेर दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्यात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.
गेल्या काही वर्षापासून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकदा आंदोलने मोर्चे काढण्यात आले,२०२० साली आझाद मैदान ,मुंबई येथे महामोर्चा आयोजन केले होते. त्यांच्या अथक प्रयत्नाने SHG ला खेळते भांडवल रू १५००० चे ३०००० प्रमाणे आर्थिक लाभ व सर्व समूदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) ज्यांचेमुळे कार्यरत कर्मचारी यांचे खाजगीकरण थांबले, मात्र CRP मानधनवाढ झाली न्हवती.
त्यानंतरही कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत माननीय राठोड यांनी पाठपुरावा केला तसेच सरकारचे लक्ष वेधण्या करिता २६जुलै २०२३ रोजी महामोर्चाचे आयोजन केले , त्याचे फलित अखेर ती मानधन वाढ.
आता कमाल रू.६००० प्रमाणे मिळणेसाठीचा निर्णयआज दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीमध्ये मा.उपमुख्यमंत्री आणि मा.गिरीशभाऊ महाजन मा.मंत्री ग्रामविकास विभाग यांचे प्रयत्नामुळे सर्व मा.मंत्री महोदय यांनी निर्णय घेऊन मा.मुख्यमंत्री यांनी जाहीरही केले.
या सर्व लढाईत आमच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून खासदार हरिभाऊ राठोड यांनी अथक प्रयत्न केले त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी खासदार हरिभाऊ राठोड तसेच सर्व मा. मंत्री महोदय,सर्व प्रशासकीय अधिकारी मान्यवर आणि उमेद संघटनेचे सदस्य यांचे कर्मचाऱ्यांचा वतीने आभार व्यक्त केलें.