Gharkul Yojna : दारव्हा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना मिळताहेत घरकुलाचा लाभ.
Gharkul Yojna : दारव्हा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना मिळताहेत घरकुलाचा लाभ.
गरजू व इतर समाज लाभार्थ्यांची पंचायत समितीत पायपीट; प्रशासनाने दुर्लक्ष !
*चेतन पवार : दारव्हा तालुका प्रतिनिधी*
दारव्हा : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र-ड, यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या नावासह याद्या प्रसिद्ध झाल्या आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनुसूचित जमाती व इतर गरजू लाभाध्यर्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर धनदांडग्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजू लाभाध्यर्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांची पंचायत समिती कार्यालयात पायपीट सुरुच आहे.
पण यानंतरही त्यांची पंचायत समिती प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र-ड, व यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल लाभार्थ्यांच्या नावासह याद्या प्रसिद्ध झाल्या आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनुसूचित जमाती व इतर गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जात आहे. मात्र घरकुलाचे वाटप करताना गरजू लाभार्थ्यांना वगळून इतर धनदांडग्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे.
यामध्ये खरोखर गरजू लाभार्थी बंधित राहत आहे. शासनाचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रत्येक गावात गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याची योजना सुरू केली आहे पण गरजू लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जात नसल्याने अनेक लाभार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये सदनशिल शेतकरी, आधी लाभ घेतलेले लाभार्थी यांचेही नावे आहेत तर काही कुटुंबातील नोकर वाचि याच्यामध्ये नाव समाविष्ट केले आहे तर यामध्ये इतर समाजातील गरजू मुस्लिम लाभार्थ्यांना या योजनेपासून दूर ठेवल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात काही इतर समाजातील लाभाथ्यर्थ्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता शासन स्तरावरूनच अल्पसंख्याक,इतर समाज अपंग व्यक्तींना समाजासाठी घरकुलाचा कोठा मंजूर नसल्याचे गरजू, इतर लाभार्थ्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी सरपंच यांनी ही योजना राबविण्यास नकार दिल्याचे सूत्राची माहिती आहे. तर काही दीड शहाणे अधिकारी मुस्लिम व अपंग व्यक्ती समाजाच्या लाभार्थ्यांना सांगत आहेत की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाका.? अशी उत्तरे दिले जात आहे. त्यामुळे या घरकुल योजनेची प्रकरण पेटागार असल्याची चित्र पाहायला मिळत आहे.
जर शासनस्तरावरुन प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपत्र-ड, यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीची सखोल चौकशी केल्यास यामध्ये गरजू लाभाथ्यर्थ्यांना डावलून अनेक धनदांडग्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे मोठे घबाड उघड होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद यवतमाळ चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी लाभार्थ्याच्या वतीने केली जात असल्याची सूत्राची माहिती आहे…