Electric Shock: शॉक लागून एका तरुण इसमाचा मृत्यू.

Electric Shock: शॉक लागून एका तरुण इसमाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब*

Electric Shock: वीजवितरण कंपनीचा हलगर्जी पणा.

शेतात पिकांच्या सरक्षनाकरीता लावलेल्या तारेच्या कंपाऊंड  वर महावितरण कंपनीच्या जिवंत तार पडल्याने एका तरुणाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. सागर रामदास वाईकर  31 वर्ष  रा. कोपरा जानकर असे मृतकाचे नाव आहे. मृतक सागर यांची कोपरा शिवारात त्यांची शेती असून शेतीत पिकांच्या संरकक्षणकरीता शेतात तारेचे कंपाऊंड बसविले आहे.

नेहमी प्रमाणे मृतक हे शेतात गेले असता त्या तारेला स्पर्श झाल्याने मृतक सागर यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती बंडू वाईकर यांना मिळताच त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता मृतक सागर हा पडून दिसला तसेच काही अंतरावर वीज वितरण कंपनीच्या जिवंत तार शेतातील कंपाऊंड च्या तारेवर पडल्याने त्या तारेला विद्युत प्रवाह शेतातील कंपाऊंड ला आल्याने न कळत मृतक सागर यांचा कंपाऊड  च्या तारेला स्पर्श झाला.व शॉक लागून मृत्यू झाला. सदर घटनेची लेखी तक्रार बंडू वाईकर यांनी बाभूळगाव पोलीस स्टेशनला दिली  आहे. त्यांच्या अचानक मृत्यू मुळे गावात हळहळ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − five =