Domestic Violence: विवाहित महिलेला जबर मारहाण करून घराबाहेर काढले. पती व सावत्र मुलगी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

Domestic Violence: पोलीस स्टेशन नेर अंतर्गत असणाऱ्या मांगला देवी येथील विवाहित महिला सौ. सुवर्णा शेलोकार वय २८ हिला तिच्या पतीने व सावत्र मुलींनी जबर मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली.या महीलेला जबर दुखापत झाली असून,ती सध्या नेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेची हाकिकत येणेप्रमाणे, मांगलादेवी येथील प्रभाकर बुद्धराम शेलोकार वय 48 यांची सुवर्णा ही दुसरी पत्नी असून आठ वर्षांपूर्वी ते विवाहबद्ध झाले आहेत.

प्रभाकर शेलोकार यांचे यापूर्वी लग्न झाले असून ,त्यांना प्रथम पत्नीपासून दोन मुली आहेत. पत्नीचे निधनानंतर त्यांनी पीडित महिलेसोबत संसार थाटला. सौ.सुवर्णा हीने सावत्र मुलींचे संगोपन व पालन पोषण केले. त्यानंतर सुवर्णा हिने एका मुलास जन्म दिला .त्याचे आजचे वय (नव वर्ष )आहे. मागील एक वर्षापासून या जोडप्यामध्ये वादविवाद सुरू झाले त्याची परिणीती “सुवर्णा” हिस घरा बाहेर जाऊन ,मोल मजुरी करून आपल्या लहानग्या मुलाचे संगोपन करण्याची वेळ आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तरीही लहान लहान कारणावरून घरामध्ये खटके उडतच होते. काल दिनांक 15 /10/ 23 रोजी घरात पुन्हा खटका उडून , प्रभाकर बुद्ध राम शेलोकार याने सौ. सुवर्णा हीस लाथा बुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण केली. व मुला सकट घराबाहेर काढून दिले. यावेळी सावत्र मुलगी कुमारी काजल व 18 हीणे सुद्धा, काठीने हल्ला चढवून आपले सावत्र आईस अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण केली. वरील घटनेची तक्रार पोलीस स्टेशन नेर ला येताच.

पीडित महिलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. भारतीय दंड विधान ३२४ 504/ 506 /34 अंतर्गत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस दल रवाना झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

thirteen + 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.