Dengue Fever: नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज : १ हजार ७४२ व्यक्तींची झाली टेस्ट.
डेंग्यूने केले शतक पार; घाबरू नको, मृत्यू रोखण्यात यश.
Dengue Fever: जानेवारी २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२३ या काळात डेंग्यूच्या निदानासाठी तब्बल १ हजार ७४२ व्यक्तींचे रक्तजल नकीकिटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले असले तरी डेंग्यू मृत्यू रोखण्यात आतापर्यंत तरी आरोग्य विभागाला यश आले आहे. डेंग्यू निर्मूलनासाठी नागरिकांनीही दक्ष राहण्याची आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याची गरज आहे.
मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात ४१४ व्यक्तींची डेंग्यू चाचणी करण्यात आली होती. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ डेंग्यू बाधितांची नोंद घेण्यात आली होती. तर यंदा जानेवारी ते ९ ऑक्टोबरपर्यंत १ हजार ७४२ व्यक्तींची डेंग्यू चाचणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ११३ व्यक्तींचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. यंदा आतापर्यंत आणि मागील वर्षीचा विचार केल्यास जिल्ह्यात डेंग्यू मृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.
स्वच्छ पाण्यात होते डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती.
घराच्या आवारात साचलेल्या स्वच्छ पाण्यात बहुदा डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आवारात कुठे पाणी साचत असल्यास ते वाहते करावे. शिवाय आठव- ड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीला मोठा ब्रेक लागत असल्याचे सांगण्यात.
डेंग्यूचा एडिस इजिप्ती डास घेतो दिवसा चावा.
डेंग्यू हा कीटकजन्य आजार आहे. तो एडिस इजिप्ती या डासाच्या चाव्यामुळे होतो. हा डास दिवसा चावा घेतो. त्यामुळे डेंग्यू या आजाराचा उद्रेक होण्याच्या दिवसांमध्ये नागरिकांनी लांब बाह्याचे कपडे परिधान केल्यास आणि झोपताना मच्छर- दाणीचा वापर करणे फायद्याचे ठरते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्या.
डेंग्यूची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने कुठलेही घरगुती उपाय करता नजीकच्या रुग्णालयात जात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घेणे फायद्याचे ठरते. शिवाय असे केल्यास डेंग्यू मृत्यू टाळता येतो.
डेंग्यूची लक्षणे काय?
अधिक तीव्रतेचा ताप, डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे, भूक मंदावणे आदी डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आहेत.
डेंग्यू या कीटकजन्य आजाराला ब्रेक लावण्यासाठी जिल्ह्यात गावपातळीवरही विशेष प्रयत्न होत आहेत. नागरिकांनी त्यांच्या घराच्या आवारात कुठे पाणी साचत असल्यास ते वाहते करावे. शिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. कुठल्या व्यक्तीला डेंग्यूची लक्षणे असल्यास त्याला नजीकच्या रुग्णालयात न्यावे. शिवाय डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधोपचार द्यावा. कुठलाही घरगुती उपाय करू नये.
– डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.