Darwha : पाथ्रड देवी येथे बैलपोळा उत्साहात साजरा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

Darwha : पाथ्रड देवी येथे बैलपोळा उत्साहात साजरा ,हजारो शेतकऱ्याचा बैलासह पोळा उत्साहात सहभाग, शेकडो वर्षापासून जय लखामाई माता पटांगनावर भरतो पोळा उत्सव.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दारव्हा तालुक्यातील पाथ्रड देवी येथील श्रावण मास संपल्यावर हिंदू धर्मात पोळा हा बैलाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाला एक दिवसाआधी बैलांच्या खान शेकनी पासून सुरुवात होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलाला मोठ्या थाटात सजवून वेगवेगळ्या प्रकारचे शिंगार करून बैलांच्या अंगावर अंगरखा टाकून बैलांना मोरपंखाचे तुर्रे लावून यांना थाटात सजवून शेतकरी त्यांना ढोल ताशाच्या गजरात वाजत-गाजत बैलांना पोळ्या भरण्याच्या ठिकाणी घेऊन जातात.

सायंकाळी सर्व बैल जोड्या आप-आपल्या घरी घेऊन बैलांचे पूजन करून हा बैल पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. पाथ्रड देवी गावामध्ये या वर्षी सुद्धा मोठ्या उत्सहात जय लखामाई माता पटांगनावर शेकडो वषार्पासून भरत आलेला पोळा यावर्षी सुद्धा भरला या बैलपोळ्यामध्ये हजारो शेतक त्यांनी आपल्या बैलांसह सहभागी झाले. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही पोळा सण शेतकरी वर्गात फार मोठं महत्त्व राखतो. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

शेतकऱ्याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला किंवा नांगराला जुंपले जात नाही, तर त्याचे पूजन केले जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा घातल्या जातात, तर पायात घुंगरू बांधतात. पोळ्याच्या दिवशी बळीराजा बैलांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पोळा सणाची परंपरा आणि गीतांचा इतिहास श्रावण अमावास्या आली की पोळ्याचा सण सुरू होतो.

अमावास्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला” अशा अनेक गीतांनी पोळ्याचा सण उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. यावेळी तिथे झालेल्या कार्यक्रमात मंचावर कार्यक्रमाच्या शोभा वाडवण्या करिता काही गावातील नागरिक उपस्थित होते.

बैलांच्या साजशृंगाराची परंपरा…

पोळ्याच्या दिवशी बैलांना खास सजवले जाते. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्यांच्या आणि घुंगरांच्या माळा, नवीन वेसण आणि पायात चांदीचे वा करदोड्‌याचे तोडे घातले जातात. त्यांना पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला जातो. बैलांची निगा राखणाऱ्या घरगड्याला नवीन कपडे दिले जातात. गावांमधील पोळा मिरवणूक पोळ्याच्या सणासाठी शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलांचा साजशृंगार करून मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या मुख्य चौकाजवळ आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. गावातील सर्व बैलजोड्या एकत्र करून त्यांची मिरवणूक काढली जाते…

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.