Darwha: पाथ्रड देवी येथिल मासेमारांवर उपासमारीची वेळ.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७.
Darwha: गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण र.न. १६२७, ता. दारव्हा जिल्हा. यवतमाळ संस्थेकडे गोकी प्रकल्प शासनाचे अटी व शर्ती नुसार बोली पद्धतीने संस्थेकडे आहे. सदरहू तलावाची संस्थेनी शासनाची P.P. करून ठेकेदाराला प्रकल्प दिलेला आहे. ठेकेदाराचे माणसं येवून प्रकल्पावर मासेमारी करणाऱ्या मासेमारांवर अरेरावी करतात. तसेच ठेकेदारांकडे चौकीदार हे परिसरातील नसुन M.P., U.P. मधील आहेत.
तलाव घेवुन लगबग दोन वर्ष झालेले आहे. तरीही ठेकेदारांने शासकीय नियमानुसार ६.५ लक्ष मत्स्य बोटुकली प्रतिवर्ष नुसार आजपर्यंत १३ लक्ष मत्स्य बोटुकली प्रकल्पामध्ये सोडणे बंधनकारक आहे. त्यांनी आजपर्यंत मत्स्यबीज टाकले नाही. त्यामुळे परिसरातील मासेमारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याची आपण प्रत्यक्षदर्शी तपासणी करावी. ठेकेदारांकडून स्थानिक मासेमारांवर दबाव तंत्र तयार करून आवाज उठविणाऱ्यावर खोटे नाटे आरोप/रिपोर्ट करून त्यांना सदर व्यवसायापासून वंचित ठेवित आहे व त्रास देत आहे. त्याच प्रमाणे मासेमारांना मच्छी खाण्यासाठी सुद्धा देत नाही.
तलावामध्ये मच्छी न सोडता झिंग्याचेच बीज सोडण्यात आले आहे. सतत दोन वर्ष मत्स्य बीज न सोडल्याने प्रकल्पावर मासेमारी करणाऱ्या मासेमारांच्या कुटुंबावर उपासी मरण्याची वेळ आलेली आहे. ठेकेदाराने संस्थेकडून शासकीय P.P. केल्याने आवाज उठविणाऱ्यावर दंडुकशाही करीत आहे. आम्ही शासनाची P.P. केलेली आहे. मी जे म्हणेल तेच होईल. माझे P.P. केल्याने कोणी काहीही करू शकत नाही.
ठेकेदार तलावामध्ये मासेमारी ऐवजी झिंगा उत्पादनावर जास्त भर देत आहे. त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असलेली अंदाजे ३५० मासेमार त्यांचे एकुण ५००० घर परिवार संख्या असून त्यांचेवर उपासमारी आलेली आहे. त्यावर तात्काळ उपाय म्हणजे संस्थेनी केलेली शासकिय P.P. रद्द करून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून परिसरातील मासेमारांना न्याय देण्यात यावा. निवेदनातून मा. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय यवतमाळ यांना देण्यात आली.अशी मागणी गोपालकृष्ण भुजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. बोदगव्हाण हे करीत आहेस.