China Manjha : चायना मांजा मुळे शहरात थरारक अपघात ,चायना मांझ्याने गळा चिरला गेला.यवतमाळ शहरात सोमवारी बेकायदेशीर चायना मांजा मुळे भयंकर घटना घडली आहे.या घटनेत एक निष्पाप नागरिक प्रशांत रामचंद्र राऊत रा.अरुणोदय सोसायटी यवतमाळ यांचा गळा चायना मांझ्यामुळे भयंकर कापला गेला.या अपघातात ते गंभीर जखमी झाले.चायना मांझ्याने त्यांचा गळा खूप चिरून गेल्याने त्यांची स्थिती चिंताजनक झाली,होती, सुदैवाने तात्काळ वैद्यकीय उपचार आणि मानेवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचा जीव वाचला.पण चायना मांझामुळे आज आणि यापूर्वी शहरात घडलेल्या अश्या प्रकारच्या गंभीर अपघाताने स्थानिक प्रशासन आणि अवैध चायना मांझा विक्री वर गंभीर प्रश्न हजर केले आहे.
अशी घडली ही गंभीर घटना.
या घटनेबाबत मिळालेल्या माहिती नुसार यवतमाळ येथील अरुणोदय सोसायटी रहिवासी प्रशांत राऊत हे गृहस्थ किराणा दुकान चालवतात,सोमवारी सकाळी अकरा वाजताचे सुमारास ते काही कामानिमित्त भोसा मार्गाने आपल्या दुचाकीने जात असतानाच रस्त्यावर पतंगचा नॉयलॉन तसेच बारीक धारदार मांजा मानेत अडकला.यावेळी प्रशांत राऊत यांचा मांझ्यामुळे गळा मोठ्या प्रमाणात चिरला जावून खूप रक्तस्त्राव झाला.या गंभीर घटनेनंतर त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ संजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल केले,यादरम्यान त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात टाके लावण्याची वेळ आली,या घटनेत सुदैवाने त्यांचे जीव वाचले पण त्यांची स्थिती नाजूक झाली होती.
चायना मांझा हा खूपच गंभीर विषय बनला असून याच्या विक्री आणि पतंग उडविण्यासाठी वापरामुळे राज्यात विविध ठिकाणी गंभीर अश्या घटना दररोज होताना नागरिक आणि प्रशासन पाहत आहेत.मात्र महाराष्ट्रात पूर्णतःबंदी असलेला नायलॉन मांजा हा यवतमाळ शहरात आणि जिल्ह्यात सर्रास विक्री करण्यात येत आहे.तर दुसरीकडे जर कुठे अशी घटना आणि अपघात घडले तर स्थानिक पोलीस कारवाई करण्याचा आवाका आणून चायना मांजा विक्रेत्यांवर टेम्पररी कारवाई करते.यानंतर अश्या विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई न झाल्याने पुन्हा या घातक चायना नॉयलान मांजाची विक्री त्यांच्याकडून सुरू होते, असा आजवरचा नागरिकांचा आणि झालेल्या कारवाई पाहता अनुभव आहे.
निष्पाप नागरिक पडताहेत अपघातांचे बळी.
चायना मांजा विक्रीवर प्रतिबंध असताना सुद्धा जास्त नफा कमविण्यासाठी यवतमाळ शहरात पतंग आणि मांजा विक्रेते खुलेआम मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहे त्यामुळे सहजासहजी मिळणाऱ्या चायना मांजा वापर पतंग उडविण्यारे शौकीन लोकांकडून वापर होतो.पण वाहन चालविताना लक्ष नसल्याने किंवा वाहनाची गती थोडी अधिक असल्याने अचानक हा घातक नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने गंभीर दुखापत करतो अनेक नागरिकांची आतापर्यंत या घातक मांझ्याने गळा कटण्याची घटना घडल्या आहे.चायना मांज्यामुळे निष्पाप वाहनधारक आणि पैदल जाणारे नागरिकांचे गळा आणि शरीराचे इतर भाग कटने आणि यामुळे इतर अपघात नेहमीचे झाले आहे.या गंभीर घटना पाहता या संदर्भात आयात निर्यातक आणि विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला करावी लागेल.असे अपघात पाहता आता चायना मांझा विकणाऱ्यावरच नव्हे तर वापरणाऱ्यांवरही कारवाई प्रशासनाकडून व्हायला हवी.यवतमाळ शहरात चायना मांजा पतंग उडविताना मोठ्या प्रमाणात वापरात येतो,मात्र थातुर मातुर कारवाईमुळे होणाऱ्या अपघातांना स्थानिक नगर पालिका, पोलीस आणि प्रशाससन याला जबाबदार आहे का असे प्रश्न निर्माण झाले आहे.
मकर संक्रांती पूर्वी मांजा विक्रेतांवर कारवाई गरजेची.
शहरात चायना नायलॉन धाग्यामुळे गंभीर अपघाताचे प्रकार याच्या विक्रीमुळे सुरू झाले आहे, विशेष म्हणजे पतंग उडविण्याची अजून मोठ्या प्रमाणावर सुरुवातही झालेली नाही.समोर येणाऱ्या मकर संक्रांति त्योहारात मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात हा त्योहार पाहता शहरातील ठराविक चायना मांजा चे ठोकविक्रेते मोठ्या प्रमाणात या मांजाची आयात करून शहरात विक्री करतात. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन एकदा केव्हातरी कारवाई करून चायना मांजा जप्त करून इतिश्री मानून घेतो.मात्र चायना माझ्यामुळे शरीर दुखापतीचे अपघात पाहता या मुद्द्यावर प्रशासनाने गंभीरतेने देण्याची गरज आहे कारण पुढील दोन महिने पतंग उडविण्याचा मौसम असतो लहान आणि मोठे सर्व लोक पतंग उडविताना शहरात सहज मिळणारे चायना नायलॉन मांजा वापरतात, त्यामुळे शहरात येत्या दिवसात यामुळे अश्या भयंकर त्रासदायक घटना होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पोलिसांनी नगरपालिकेकडून संयुक्त कारवाई करून चायना मांजा ठोक आणि रिटेल विक्रेत्यांवर छापे टाकून हा मांजा विक्री बंद करावी सोबतच अश्या विरुद्ध अटकेची कारवाई होऊन याच्या विक्रीवर पूर्ण प्रतिबंध आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शहरातून होत आहे.
नायलाॅन मांजावर बंदी असतानाही सर्रास विक्री होते कशी?.
चायना मांजा विक्रीवर राज्यात पूर्णतः पाबंदी आहे. या संदर्भात न्यायालयाने निर्णय दिलेले आहे. मात्र विक्रीवर आणि वापरावर प्रतिबंध असतानाही याची विक्री कशी होते हे नागरिकांना पाडणारे एक कोडेच आहे.चायना मांजा मुळे राज्यात आता पर्यंत अनेक लोकांचा बळी गेला.गंभीर दुखापतीच्या घटना झाल्या.अशा घटना वारंवार घडतात,त्यामुळे चायना मांज्यावर बंदी आणि मांज्याचा उपयोग आणि विक्री विरूध्द गंभीर स्वरूपाची कारवाई होने अत्यंत आवश्यक आहे.पतंग उडविणारे आपली करमणूक करतात पण अशा घटनांमुळे दुस-यांचे प्राण जाण्याची वेळ येते. त्यामुळे सामाजिक स्तरावरही घातक चायना मांझा वापर आणि विक्रीवर प्रतिबंध व्हावा यासाठी जनजागरण करण्याची अश्या विविध गंभीर घटनांमुळे गरज निर्माण झाली आहे.