Child Abuse: शहरातील 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार.

72 वर्षीय नराधम पोलीसांच्या ताब्यात.

Child Abuse: घरात बसून टीव्ही पाहात बसलेल्या 8 वर्षिय बालिकेला तुझी आजी कोठे गेली , मला तीला भेटायचे आहे असे विचारून तेथील पलंगावर येऊन बसलेल्या 72 वर्षीय आरोपीने बालीकेशी अश्लिल चाळे करीत अत्याचार केल्याची घटना दि. 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास शहरातील एका कॉलनीमध्ये घडली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या प्रकरणी पिडीत बालीकेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीसांनी आरोपी दिगंबर लक्ष्मण सुर्यवंशी वय 72 वर्षे रा. उंचवडद याचे विरुद्ध भादंवि 376, 376 ( अ , ब ) सहकलम 4, 6 पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी नराधमास अटक केली आहे. निरागस बालीकेवर अत्याचार झालेली 9 दिवसांच्या कालावधीत तालुक्यात घडलेली ही दुसरी घटना असल्याने समाजमन सुन्न झाले असून अशा सैतानी प्रवृत्तीच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असा टाहो फोडला जात आहे.

पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात ए पी आय निलेश सरदार , पो को गजानन गिते करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.