नगरपालिकेचा नवा उपक्रम; शहरात घरावरील कोड स्कॅन करूनचं घंटागाडी कचरा उचलणार.

नगरपालिकेचा नवा उपक्रम; शहरात घरावरील कोड स्कॅन करूनचं घंटागाडी कचरा उचलणार.

Buldhana : कचरा संकलनात पारदर्शीपणा आणण्यासाठी आता शहरातील प्रत्येक घरावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच हा उपक्रम राबविण्यात येणार असून, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांना घरावरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

खामगाव शहरातील कचरा संकलनास होत असलेला विलंब तसेच इतर गंभीर प्रकार रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी शहरातील प्रत्येकघरावर तसेच दुकानांवर आयसीटी बेस्ड टेक्नॉलाजीद्वारे स्कॅनिफाय क्यूआर कोड लावण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा संकलन केल्यानंतर घंटागाडी कर्मचाऱ्याला हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.

त्यामुळे शहरातील कचरा संकलनाची इत्यंभूत माहिती ऑनलाइन समजेल. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानातंर्गत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा पवित्रा पालिका प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेगवेगळ्या वेळेत घंटागाडीद्वारे कचऱ्याचे संकलन केले जाते.

मात्र, तरीही काही नागरिक तसेच व्यावसायिक उघड्यावर कचरा टाकतात. जुन्या नगरपालिका इमारती शेजारी कचरा टाकणारे व्यावसायिक आता पालिकेच्या रडारवर असल्याचे दिसून येते. त्याचवेळी बाजारातही कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेचा वॉच राहणार आहे. येत्या काही दिवसांत हा उपक्रम नगर परिषद राबविणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 7 =