Brutal Murder Case: पिपंळखुटि येथे दगडाने ठेचून युवकाचा खून.

Brutal Murder Case: पिपंळखुटि येथे दगडाने ठेचून युवकाचा खून.

पिपंळखुटी येथील देशी दारू तेलंगणात राज्यात: उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष.

Brutal Murder Case: दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. सदर ही घटना चेकपोस्टजवळील पिंपळखुटी परिसरात दि. १८ ऑक्टोबर २०२३ बुधवारी रात्री सात ते आठ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवीण नामदेव मंडपाचे (२८) रा. पिंपळखुटी असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव असून तर शमशाद खलिफा सादिक खलिफा (२४) रा. बिहार ह.मु. निराला जिल्हा आदिलाबाद,मोहम्मद इसराईल मो.

गोगल खलिफा (४६) रा. पिंडोता (बिहार) अशी मारेकऱ्यांची नाव आहे. मृतक आणि दोघांमध्ये एका दारूभट्टीसमोर किरकोळ कारणातून वाद झाला होता. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी दगड उचलून तरुणाच्या डोक्यात घातला. यामध्ये गंभीरजखमी झालेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

खुनाची माहिती मिळताच पांढरवकडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल माळवे, एपीआय संदीप नरसाळे, जमादार वसंत चव्हाण, रामजी राठोड, किशोर आडे, सिद्धार्थ कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 − 2 =