भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण.

भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण.

उमरखेड पंचायत समितीच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन.

उमरखेड: सहकारमहर्षी ,शिक्षणमहर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे दि . ९ नोव्हेबर रोजी संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात ४६ आदर्श शिक्षक व उत्कृष्ठ पंचायत समितीचे कर्मचारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षणाधिकारी सतिश दर्शनवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड , अँड वानखेडे ताई भाऊसाहेब माने गौरव कृती समिती अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी सचिव बालाजी वानखेडे हे विचारपीठावर उपस्थीत होते.

लोकनेते भाऊसाहेब माने हे शिक्षक होते यांनी जनपथ ते पंचायत समितीचे पहीले सभापती म्हणून उत्कृष्ठ कार्य करून सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक , सहकार , कृषी, आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे दरवर्षी पंचायत समितीच्या वतीने भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्या जातो.

भाऊसाहेब माने यांनी सहकार चळवळीत संवेदनशील कार्य करून शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला भाव मिळावा म्हणुन कापसावर प्रक्रीया करण्याच्या उद्देशाने आपला जीन प्रेसची स्थापना केली.

उमरखेड तालुक्यातील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याना उत्कृष्ट शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे काम भाऊसाहेब माने यांनी केले त्यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदच्या माध्यमातुन ब्राम्हणंगाव, चातारी येथे विद्यालया सोबत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वस्तीगृहाची स्थापना केल्यामुळे उमरखेड तालुक्यातील गोरगरीबांची मुले मुली शिकली आणि आधिकारी पदाधिकारी झाली.

त्यामुळेच पंचायत समिती तर्फे दरवर्षी भाऊसाहेब माने आदर्श पुरस्काराचे वितरण होत असते या कार्यक्रमाचे संचलन अनिल वाघ यांनी प्रास्ताविक केंद्रप्रमुख बोंम्पीलवार यांनी केले आभार सतोष घुगे यांनी केले कार्यक्रमाला उमरखेड पंचायत समितीच शिक्षक शिक्षिका तथा तालुक्यातील सर्व कर्मचारी मोठया संख्खेने उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + 3 =