*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
Rojgar Melava: बाभूळगाव येथे आमदार अशोक ऊईके यांच्या प्रयत्नाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव वतीने दि.12जानेवारी रोजी बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोक ऊईके हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष नितीन परडखे, तहसीलदार मिरा पागोरे, हेमंत ठाकरे, चुडामन मदारे,गौतम लांडगे,शहर अध्यक्ष अनिकेत पोहोकार, विक्की परडखे, महिला आघडीच्या अध्यक्षा नीलिमा आजमिरे, सोनू शर्मा, नरेंद्र बोबडे हे मंचकावर उपस्थित होते. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी १९० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
मेळाव्यामध्ये एकूण ११ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. कंपन्यांकडील २ हजार १९३ रिक्त पदे अधिसूचित करून मुलाखतीकरीता कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित होते. रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आ.डॉ. अशोक उईके यांनी उपस्थित उमेदवारांना विद्यार्थ्यांनी अवगत केलेले ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून आपले व आपल्या. परिवाराचे भविवित्व घडवावे व उमेदवारांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्याचा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर एकूण १९० विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली. प्रत्यक्ष त्या ठिकाणीच कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे एकूण १७ विद्यार्थ्यांची ऑफर लेटर देऊन निवड केलेली आहे. मेळाव्यास स्वयंरोजगाराच्या दृष्टीने तसेच कर्ज योजनेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडल, संत रोहिदास चर्मोधोग व चर्मकार विकास महामंडल, वसंतराव नाईक विमुक्त जाति व भटक्या जमाती विकास महामंडल.\
महाराष्ट्र राज्य ईतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडल,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडल आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचेकडे असलेल्या कर्ज योजनेविषयी माहिती दिली, हा रोजगार मेळावा यशस्वी करण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शीतोळे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगांव प्राचार्य विशाल मीलमीले यांनी अथक परिश्रम घेतले.