Akola News IPL 2025 : अकोल्याचे दोन मुले गाजवणार IPL 2025.

Akola News IPL 2025 : अकोल्याचे दोन मुले गाजवणार IPL 2025. ,कोणत्या संघाने खरेदी केले अकोल्याचे दोन क्रिकेटर्स ? देशाच्या क्रिकेट विश्वाला अकोला शहरातून दोन नवोदित क्रिकेट खेळाडू मिळणार आहे. या शहरातील दोन क्रिकेट खेळाडूंना आयपीएल 2025 ऑप्शन मध्ये दिग्गज क्रिकेट टीमने खरेदी केली आहे. अकोला शहरातील या क्रिकेट खेळाडूंची नावे आहेत दर्शन नळकांडे आणि अथर्व तायडे. हे दोघेही विदर्भाच्या अकोला येथून आहेत.या दोन्ही क्रिकेट खेळाडूंना आयपीएल 2025 मध्ये भारत आणि विश्वातील स्टार क्रिकेट खेळाडूंसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. अथर्व आणि दर्शन या दोन्ही क्रिकेट खेळाडूंचे आयपीएल मध्ये समावेश झाल्याने संपूर्ण अकोला जिल्ह्यात आणि विदर्भात क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण दिसत आहे. या दोन्ही क्रिकेट खेळाडूंच्या कुटुंबात सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सौदी अरेबिया मध्ये झाली आयपीएल क्रिकेट खेळाडूंची खरेदी.

आयपीएल 2025 साठी खेळाडूंच्या ऑक्शन सौदी अरेबिया येथील जेद्दाह या शहरात नुकताच पार पडला.या लिलावात विदर्भातील अकोला शहरातील या दोन खेळाडूंना आयपीएल मध्ये समाविष्ट करण्यासाठी लिलावात खरेदी झाली.यात विशेष म्हणजे पुढे होणाऱ्या आयपीएल 2025 च्या खेळाडूंसाठी झालेल्या या लिलावात महाराष्ट्रातील विदर्भातून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर आयपीएल साठी टीम खरेदी करणाऱ्या व्यवस्थापन कडून विदर्भातील खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे. यात विशेषतःअकोल्यातील दोन क्रिकेटपटू दर्शन नळकांडे आणि अथर्व तायडे यांना मोठा यश मिळालं आहे. सोबतच अमरावतीच्या जितेश शर्माला देखील या आयपीएल लिलावात मोठी रक्कम म्हणजेच 11 कोटी रुपयात आरसीबी या टीम मध्ये सामील करण्यात आले आहे.

अमरावतीच्या जितेश शर्मावर 11 कोटींची बोली.

जेद्दाह मध्ये झालेल्या आयपीएल 2025 ऑक्शन मध्ये लिलावाच्या पहिल्या दिवशी विदर्भातील अमरावती शहरातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि क्रिकेट खेळात यष्टीरक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज करणाऱ्या जितेश शर्मा याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने 11 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात सामील केले आहे.जितेश शर्मा हा विदर्भ क्रिकेट संघाचा खूप महत्वाचा सदस्य आहे. आतापर्यंत जितेशने आपल्या क्रिकेट खेळाचे कौशल्य आणि उत्कृष्ट प्रदर्शनाने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये प्रदर्शन केले आहे.मागील आयपीएल सामन्यांमध्ये जितेशच्या प्रदर्शनाला पाहता आरसीबीने त्याला यंदा ऑप्शन मध्ये मोठी बोली लावून आपल्या संघामध्ये सामील केले आहे. त्यामुळे अमरावती शहरातील जितेशच्या आयपीएल मध्ये सामील झाल्याने आनंद उत्सव साजरा केला जात आहे.

कोण आहेत दर्शन नळकांडे आणि अथर्व तायडे?

आयपीएल मध्ये सामील झालेले दर्शन नळकांडे आणि अथर्व तायडे दोघेही अकोला शहरातील रहिवासी आहे त्यांना आयपीएल 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी दर्शन नळकांडे या क्रिकेट खेळाडूने राष्ट्रीय स्तरावर अनेक क्रिकेट सामन्यात उत्कृष्ट असे प्रदर्शन केल्याने यंदाच्या आयपीएल 2025 साठी गुजरात टायटन्स या संघाच्या व्यवस्थापनाने दर्शनला गुजरात टायटन्स मध्ये समाविष्ट केले आहे त्याच्यावर मोठी बोली लावून या संघाच्या व्यवस्थापनाने दर्शनला आपल्या संघामध्ये सामिल करून घेतले आहे. विशेष म्हणजे दर्शन नळकांडे हा यापूर्वी सुद्धा गुजरात टायटन साठी खेळला आहे.आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. दर्शन हा विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असून या 24 वर्षीय खेळाडूसाठी 30 लाख रुपयांची मोठी बोली लावून दिल्ली कॅपिटल संघाने त्याला आपल्या टीम मध्ये सामील केले आहे. तर यापूर्वी अथर्व तायडे हा पंजाब किंग्स इलेव्हनच्या संघात यापूर्वी सामील झाला होता पण त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र या नंतर झालेल्या आयपीएलच्या एका सामन्यात त्याने अजिंक्य रहाणे या मोठ्या क्रिकेट खेळाडूचा विकेट घेतल्याने तो आय पी एल मध्ये खूप झळकला होता. यामुळे आता त्याला आपल्या वेगवान गोलंदाजीच्या भरवशावर आयपीएल मध्ये स्थान मिळाले आहे.हा उत्कृष्ट खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर समोर यावा यासाठी त्याला लिलावात खरेदी करण्यात आले आहे.अकोला शहरातील दर्शन नळकांडे आणि अथर्व तायडे या दोन्ही क्रिकेट खेळाडूंची आयपीएल संघात निवड त्यांच्या कठोर मेहनतीचा परिणाम आहे, त्यांच्या या यशामुळे अकोला शहरात भविष्यात क्रिकेटची आवड आणि इतर नवोदित खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

fourteen − 9 =