Akola Crime: जिल्हयात अमावस्या नाकाबंदी दरम्यान, कलम १२२मपोका अन्वये ९ केसेस, भारतीय हत्यार कायदयान्वये ०५ केसेस.

Akola Crime: जिल्हयात अमावस्या नाकाबंदी दरम्यान, कलम १२२मपोका अन्वये ९ केसेस, भारतीय हत्यार कायदयान्वये ०५ केसेस.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन*

Akola Crime: जिल्हयात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरीता दि.०९.३.२०२४ चे रात्री २२.०० ते दि.१०.३.२०२४ चे ०५.०० पावेतो मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चनसिंह यांचे आदेशान्वये अकोला जिल्हयात अमावस्या नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी असे एकुण ४२ अधिकारी व २४० अंमलदार यांनी सहभाग घेवुन नाकाबंदी दरम्यान खालील प्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान रिफ्लेक्टर जॅकेट व टॉर्च घेवुन नाकाबंदी ZIG ZAG स्वरूपाचे बेरेकेटींग करून तपासलेले प्रत्येक वाहनाचा कंमाक व चालकाचे नाव, पत्ता व मोबाईल कंमाक घेवुन दुचाकी २९७ व चारचाकी २३९ असे एकुण ५३६ वाहने चेक करून त्यापैकी ९१ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करून एकूण ३२७००रू दंड आकारण्यात आला.

१७४समन्स, ५९बेलेबल वारंट, १९ नॉनबेलेबल वारंट तामील करण्यात आले, तसेच ६८ निगराणी बदमाश व २९ माहितीगार गुन्हेगार चेक करण्यात आले आहे, कलम १२२ मपोका प्रमाणे एकुण ०९ कारवाई, भारतीय हत्यार कायदयान्वये ०५ कारवाई करून ०५ शस्त्र जप्त करण्यात आले आहेत, कलम ३३ आर डब्लयु प्रमाणे ०१ केसेस, कलम ११०, ११७ मपोका प्रमाणे एकूण ४३ केसेस तसेच जिल्हयातील एकुण ५७ हॉटेल लॉजेस व ५३ एटीएम चेक करण्यात आले.

महा. दारूबंदी कायदयान्वये ०८ कसेस करण्यात आल्या आहेत. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांनी जिल्हयात मालमत्तेच्या व शरीराविरुध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरीता अशा प्रकारचे वेळोवेळी नाकाबंदी चे आयोजन करून सन २०२४ मध्ये एकुण ४१ कारवाई केल्या तसेच कलम १२२ मपोका प्रमाणे एकुण ३८ केसेस करण्यात आल्या आहेत. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 20 =