Unified Pension Scheme : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर निश्चितपणे पेन्शन सुरक्षा मिळावी,यासाठी आता केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी अशी वार्ता दिली आहे.युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे{Unified Pension Scheme Implemented From 1 April}.नुकतेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जीवन जगणे सहज व्हावे,त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी मोदी सरकारचे नवीन पेन्शनची हि योजना महत्त्वाचा निर्णय मानल्या जात आहे. जे केंद्रीय कर्मचारी केंद्रातील योजनेप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी सहभागी होत असेल,अश्या कर्मचारीना आता सेवेत असतानाच यूपीएस Unified P Scheme साठी आपली नोंदणी करण्याचा पर्याय दिलेला आहे.त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर या पेन्शन सुरक्षा योजनेचा निश्चितपणे लाभ मिळणार आहे.
देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता निश्चित पेन्शन मिळावी यासाठी मोदी सरकारने हे मोठे पाऊल उचलले उचलून याची अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.यापूर्वीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरात लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन प्रणालीतून या युनिफाईड पेन्शनची घोषणा केलेली होती,आता ही योजना येत्या 1 एप्रिल 2025 पासून सुरू होत आहे.या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन सुरक्षा मिळणार आहे{Pension Guarantee}
जुन्या पेन्शन योजनेच्या काही मागण्यांची पूर्तता होण्याची शक्यता.
आता ही राष्ट्रीय पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने लागू करताच एका शक्यतेनुसार येत्या काही काळात इतर काही राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही युनिफाईड पेन्शन योजना लागू करू शकते.दरम्यान ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी या पेन्शन योजनेत नोंदणी केलेली आहे.
किंवा ते यासाठी सामील झाले आहे,आणि यासाठी योगदान देत आहेत,अशा कर्मचाऱ्यांसाठी आणि उर्वरित सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम निवड करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.या पेन्शन सुरक्षा योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक मजबुती मिळणार आहे.केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय पेन्शन योजनेतून जुन्या पेन्शन योजनेच्या काही मागण्यांची सुद्धा पूर्तता होणार असल्याची शक्यता आहे.
Unified Pension Scheme : जाचक तरतुदीमुळे पेन्शन योजनेवर टीका.
विशेष म्हणजे तत्कालीन अटल बिहारी वाजपायी सरकारने ही युनिफाईड पेन्शन स्कीम वास्तविकपने सुरु केली होती.मात्र या नवीन पेन्शन योजनेचा विरोधी पक्षांकडून विरोध होत होता.केंद्राच्या या नवीन पेन्शन स्कीम मधील जाचक तरतुदीमुळे विरोधक या पेन्शन योजनेवर टीका करीत होते.
तर यानंतर देशात वर्ष 2022 ते 23 दरम्यान केंद्राच्या विरोधी पक्षात असलेल्या आणि राज्यात सत्तेत असलेल्या राजस्थान,हिमाचल प्रदेश,पंजाब,छत्तीसगड सारख्या राज्य सरकारांनी नंतर तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीची ओल्ड पेन्शन स्कीम सुरू केली आहे(Old Pension Scheme).तर दुसरीकडे आता महाराष्ट्रात ही सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जाणून घ्या कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार UPS मधून 50 टक्के पेन्शनची गॅरंटी?
आता केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येत असलेल्या युनिफाईड पेन्शन इसकी मध्ये केंद्रातील सर्व जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजनेचे थेट लाभ मिळणार आहे.यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर त्यांच्या शेवटच्या सेवा काळात मिळालेल्या 12 महिन्यांच्या सरासरी बेसिक वेतनाच्या आधारावर 50% इतकी पेन्शन मिळण्याची गॅरंटी या UPS स्कीम मधून मिळेल{Basic Salary Of Last 12 Service Months}.
यासाठी 25 वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवा पूर्ण करणे आवश्यक असेल,मात्र असे कर्मचारी ज्यांनी यूपीएस पेन्शनची निवड केलेली आहे,यानंतर ते नॅशनल पेन्शन स्कीमची निवड करू शकणार नाहीत{NPS}.उल्लेखनीय म्हणजे युनिफाईड पेन्शनमध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या आधारावर पेन्शनमध्ये वाढ करणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळत असल्याने महागाईपासून दिलासा मिळणार,असा दावा या माध्यमातून होत आहे.
ही आहेत युनिफाइड पेन्शन योजनेची खास वैशिष्ट्ये.
- केंद्र सरकारच्या या नवीन राष्ट्रीय युनिफाईड पेन्शन योजनेनुसार सलग 25 वर्षे शासकीय नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच शेवटच्या बारा महिन्यांमध्ये मिळत असलेल्या सरासरी बेसिक पेमेंट आधारावर 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे.
- 10 वर्ष सरकारी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर दरमहा 10 हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळेल.
- यासाठी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन साठी नोंदणी करून आपल्या वेतनातून पेन्शनसाठी आर्थिक योगदान द्यावा लागणार आहे.
- जर केंद्र सरकार संभाव्य जुनी पेन्शन योजना लागू करीत असेल,तर पूर्वीच युनिफाईड पेन्शनमध्ये सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- काही कारणामुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये नवीन राष्ट्रीय पेन्शन आणि जुन्या पेन्शन संदर्भात संभ्रमाची स्थिती दिसत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास UPS पेन्शन मधून 60 टक्के रकम मिळविण्यासाठी पात्र ठरतील.
निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्या कर्मचाऱ्यांच्या निकटवर्ती कुटुंबिय त्या कर्मचाऱ्यांने शेवटच्या वेळी काढलेल्या एकूण पेन्शनच्या 60 टक्के रकम मिळविण्यासाठी पात्र ठरतील.या तिन्ही पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याला महागाईची सवलत मिळेल.केंद्र सरकारने याची गणना ही औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत इंडेक्स आधारावर असेल,अशी व्यवस्था केली आहे.सोबतच कर्मचाऱ्यांना त्यांच्या रिटायरमेंट नंतर ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त एकरकमी पैसा मिळणार आहे.
या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?
केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन स्कीम प्रामुख्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.ज्या कर्मचाऱ्यांचा नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये समावेश आहे,असे कर्मचारी या युनिफाईड पेन्शन स्कीम साठी स्विच करण्याच्या पर्याय निवडू शकतील.यामुळे देशभरात 23 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात.
जे कर्मचारी 2004 नंतर केंद्रातील सरकारी सेवेत दाखल झालेले आहेत,आणि ज्यांना नॅशनल पेन्शन स्कीम लागू आहे.अश्या सर्व कर्मचाऱ्यांना या युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
विविध राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी UPS योजना पर्याय असण्याची शक्यता.
येत्या काळात देशभरात विविध राज्यांमध्ये राज्य सरकारांकडून या राष्ट्रीय युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्याचा पर्याय स्वीकारला ? तर त्या राज्यामधील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना स्वीकार करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
यामुळे देशभरात केंद्रीय आणि राज्यस्तरीय कर्मचारी असे मिळून 90 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना या राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकेल.विशेष म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत सेवेतून निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही केंद्राच्या या पेन्शन योजनेचा लाभ पर्याय असल्याने घेता येणे शक्य आहे.
अशा कर्मचाऱ्यांनी या राष्ट्रीय पेन्शन योजनेचा पर्याय स्वीकारला असेल,तर त्यांना सेवेसाठी ग्रॅच्युईटी {GPF}आणि सर्व थकबाकीसह पुढे UPS Pension Guarantee योजनेचा लाभ मिळणार आहे.