Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती?

Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती? दोन्ही पवारांचे शिलेदार आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांत सत्तेसाठी बनली गौतम अदानींच्या निवासात रणनीती

महाराष्ट्रात भाजपकडून महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप आणण्यासाठी ऑपरेशन लोटस वर काम सुरू असल्याची चर्चा होत असताना,महाविकास आघाडीमध्ये सूरंग लावण्यासाठी गुरूवारी भाजप आणि उद्योगपतींकडून मोठी बैठक झाली आहे.एनसीपी शरद पवार गटाच्या खासदारांना आपल्या तंबूत दाखल करण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत दस्तूर खुद्द शरद पवार आणि अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हजर असल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

अदानींच्या घरीही गुरुवारी राजकीय चर्चा

अजित पवार आणि त्यानं त्यांच्या नेत्यांची शरद पवार यांच्या भेटीनंतर गुरुवारीच दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी भाजपचे केंद्रीय स्तरातील वरिष्ठ नेते,आणि दोन्ही पवार गटाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली. यामध्ये आगामी निवडणुका आणि शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे नेते मिळून सत्तेत सामील होण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची भूमिका काय आणि भाजप यासाठी कोणती भूमिका घेणार यावर अदानी यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र आणि केंद्रात सत्तेवर काय भूमिका घेणार ही उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.

केंद्रात सत्तेचे समीकरण साधणार का एनसीपी शरद पवार गट ?

शुक्रवारी उद्योगपती अदानी यांच्या निवासस्थानी एनसीपी नेते आणि भाजप नेत्यांमध्ये बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही नेते केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेचे समीकरण साधणार असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र दुपारपर्यंत एनसीपी शरद पवार गटाकडून याबाबत कोणताही अधिकृत भाष्य करण्यात आला नव्हता.मात्र महाविकास आघाडीमधील पक्षांचे खासदार फोडण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विविध नेत्यांमध्ये या भेटीत पुढील रणनिती वर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीमुळे लवकरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे..शुक्रवारी सकाळीच राजकीय सूत्रांकडून या संदर्भात माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडताना दिसत आहे.

गुरुवारी झाली होती काका पुतण्यांची भेट.

मुख्य म्हणजे गुरुवार गेला डिसेंबर रोजी राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार हे आपल्या कुटुंबीय आणि पक्ष नेत्यांसोबत दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवस असल्याचे निमित्त साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांसह भेट घेतली.या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.मात्र यानंतर माध्यमांसोबत बोलताना अजित पवार यांनी आपण पवार घरातील सदस्य असल्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो या दरम्यान कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

कुटुंब म्हणून शरद पवार अजित पवार एकत्रित येण्याची गरज
सुनंदा पवार यांचे महत्त्वाचे भाष्य.

विशेष म्हणजे कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची दिल्लीमध्ये मुलाखत झाली होती. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर दोघांची दिल्लीमध्ये ही भेट महत्त्वाची मानली जात असताना याचे राजकीय अर्थ लावल्या जात होते. यानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते आणि शरद पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी शुक्रवारी पवार कुटुंबांसंबंधात महत्त्वाचे भाष्य केले आहे.सुनंदा पवार यांनी म्हटले आहे की आता कुटुंब म्हणून शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित येण्याची गरज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये सहभागी होणार का?.

राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये सहभागी होणार का, यावर महाराष्ट्रात राजकीय चर्चा सुरू झाली आहे. कारण शुक्रवारी देशाचे प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्ली मधील निवासस्थानी भाजप आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये कथित भेट झाली आहे.प्रसार माध्यमातून वृत्तही यासंदर्भात समोर आले आहे.

शरद पवार राष्ट्रवादी गटात फक्त सत्तेवर चर्चा.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय नेत्यांचे दोन गट आहेत.मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सध्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रात सत्तेत सामील होण्यावर चर्चा होत असल्याची माहिती राजकीय सूत्र देत आहेत.कारण विधानसभा निवडणुकांचे निकालानंतर शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. आणि यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांमध्ये सत्तेत सामील होण्यासाठी दोन मतप्रवाह दिसत आहे. ते म्हणजे यात एका गटाचं म्हणणं आहे, की शरद पवार गटाने भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे, की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांचे आमदार आणि खासदार घेवून सरकारमध्ये जावं. मात्र सत्तेचे समीकरण बनविण्यात हे नेते गुंतले असताना महत्वाचे म्हणजे शरद पवार यांच्या भूमिकेवर सर्व अवलंबून आहे. जर त्यांनी महाविकास आघाडीतून दूर होण्यासाठी थेट भूमिका घेतल्यानंतरच एनसीपी शरद पवार गटाच्या नेत्यांचे महाविकास आघाडीत मोठी फूट टाकूनच त्यांचा सत्तेत सामील होण्याचा मार्ग प्रशस्त होईल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fourteen + sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.